‘फक्त घोषणा आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत’, रक्षा खडसे यांची ठाकरे सरकारवर टीका

राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमिनीचंही नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. या मुद्द्यावरुन खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

'फक्त घोषणा आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत', रक्षा खडसे यांची ठाकरे सरकारवर टीका
उद्धव ठाकरे, रक्षा खडसे
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 2:40 PM

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमिनीचंही नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय. या मुद्द्यावरुन खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. (MP Raksha Khadse criticizes Mahavikas Aghadi government for farmers help)

फक्त घोषणा करुन आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. मात्र, खूप कमी मदत शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. सरकारनं शेतकऱ्यांकडे पूर्ण दूर्लक्ष केल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केलाय. मी सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे असं सांगतानाच शेतकऱ्यांकडे लक्षं द्या, अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केलीय.

जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत.

एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता.

खडसे बापलेकीचा अर्ज कायम

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. या ठिकाणी रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची चिन्हं आहेत. रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारीची संधी मिळणार आहे. संतोष चौधरी यांना पक्षांतर्गत कुरघोडींचा फटका बसल्याचं दिसत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: पेट्रोल-डिझेलवर 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले, तुमचं मन कुजकं आणि सडकं; संजय राऊतांचा हल्लाबोल

नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी

MP Raksha Khadse criticizes Mahavikas Aghadi government for farmers help

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.