AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंचा विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस ठरला

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Worli Vidhansabha) विधानसभा निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

आदित्य ठाकरेंचा विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस ठरला
| Updated on: Sep 29, 2019 | 5:47 PM
Share

मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Worli Vidhansabha) विधानसभा निवडणूक लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लढणार हेही निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा (Aditya Thackeray Worli Vidhansabha) मतदारसंघातून लढणार आहेत. आदित्य ठाकरेंनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीनिशी उडी घेतल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरणार आहेत.

आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत घोषणेकडेच शिवसेनेचं लक्ष असल्याचंही बोललं जात आहे. युतीची घोषणा लांबल्यामुळे आदित्य यांची उमेदवारी पक्षाने अद्याप अधिकृतपणे घोषित केली नाही. युतीच्या घोषणेनंतर शिवसेना तात्काळ स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने त्या दिवशी वरळीत शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन होण्याचीही शक्यता आहे.

शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यावेळी अहिर यांनी आदित्य ठाकरेंना आता तरी वरळी विधानसभेचा पेपर फोडा असं आवाहन केलं होतं. मात्र “युतीचं चित्र स्पष्ट न झाल्याने सध्या पेपर तपासणी सुरु आहे. नंतरच खरे पेपर फुटतील”, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं.

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि वरळी विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार अशी चर्चा सुरु झाली. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचा सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने पत्ता कट होणार का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र, वरळीत सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी शक्ती प्रदर्शन केलं आहे.

युवा सेनेची पोस्टरबाजी

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना आमदार अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात आली होती.

संपूर्ण वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. ‘हीच ती वेळ आहे, नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलं.

संबंधित बातम्या :

आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?

वरळीतून विधानसभा लढवून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार, अनिल परब यांनी ‘ठरवलंय’

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...