AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन खुलासे : बँक ट्रान्सफर, तुर्किश शस्त्रे, बाईक अपघात आणि कपडे बदलण्याची कहाणी

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आरोपींनी पोलीस चौकशीत हत्येच्या दिवशी बाईकचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा बाईकवरुन अपघात झाल्यामुळे त्यांनी रिक्षा वापरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच आरोपींनी हत्या केल्यानंतर कपडेही बदलले होते.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन खुलासे : बँक ट्रान्सफर, तुर्किश शस्त्रे, बाईक अपघात आणि कपडे बदलण्याची कहाणी
| Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 16, 2024 | 9:29 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आरोपींच्या पोलीस चौकशीत याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हत्येच्या दिवशी बाईकचाच वापर करणार होते. पण हत्येच्या आधी बाईकवरून दोन आरोपी पडले होते. त्यामुळे त्यांनी बाईकवरून जाण्याचा निर्णय रद्द केला आणि रिक्षा वापरली. आरोपींनी पोलीस चौकशीत ही माहिती दिली. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तीनही आरोपींनी स्वत:चे कपडे बदलल्याचं समोर आलं आहे. त्यांनी पळून जाण्यासाठी हा प्लॅन केला होता.

पोलिसांच्या तपासात नवे खुलासे

या प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर याने हरीशकुमार बालकरामला 60 हजार रुपये बँक खात्यातून ट्रान्सफर केले होते. त्यापैकी ३२ हजारांची आरोपींनी जुनी आपाची कंपनीची बाईक घेतली होती. याच बाईकवरून आरोपीनी अनेकदा बाईकवरून रेकी केल्याच समोर आलं आहे. आरोपींनी घटनेच्या दिवशी गोळीबार झाला त्या ठिकाणी जवळपास तासाभरापासून वाट पाहत उभे होते.

बाईक अपघात आणि रिक्षाचा वापर, हत्येतील नवीन वळण

पोलिसांना तुर्किश मॉडलची बंदूक काल सापडलेल्या एका बॅगमध्ये सापडली आहे. आरोपींनी वापरलेल्या बंदुकीपैंकी एक ऑस्ट्रेलियन, एक तुर्किश आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल अशा तीन बंदुकांचा समावेश आहे. आरोपी शिवकुमारने जी बॅग पळून जाताना फेकली त्यामध्ये एक बंदूक, एक आधारकार्ड आणि एक शर्ट पोलिसांना सापडले आहे. याच बॅगमध्ये बाईक विकत घेतल्याचे ३२ हजारांचे बिल सापडले आहे. हत्येदिवशी आरोपीनी ज्या रिक्षाचा आधार घेतला त्या रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.

सलमान खानच्या घराबाहेर 100 पोलीस तैनात

दरम्यान, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 मुंबई पोलीसांचे जवान तैनात आहेत, ज्यामध्ये काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत. सलमान खानच्या गॅलेक्सी घराबाहेर असलेली कार त्याच्या स्कॉटची आहे. याशिवाय त्याच्या घराबाहेर २४ तास पोलीस तैनात असणार आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीनेही सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे. सध्या सलमान खानच्या घराबाहेर सर्वत्र ठिकाणी पोलीस तैनात आहेत. त्यांच्या घराबाहेर पोलीस छावणी स्वरूप झाले आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे होते. त्यांच्या हत्येनंतर सध्या पोलीस सतर्क झाले आहेत.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी