AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीची मुंबईत बैठक, बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया?

आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. निवडणूक एकत्र लढणार आहोत. जनमाणस आमच्या बरोबर आहे. विभागवार बैठका सुरू करू. १७ तारखेनंतर महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत.

महाविकास आघाडीची मुंबईत बैठक, बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 02, 2023 | 10:22 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील बहुतेक सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा वज्रमूठ सभा होणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार करण्यात आला. बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. निवडणूक एकत्र लढणार आहोत. जनमाणस आमच्या बरोबर आहे. विभागवार बैठका सुरू करू. १७ तारखेनंतर महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत.

गुरुजी म्हणावे की नाही असा प्रश्न

दोन आठवड्याचं कामकाज झालं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समर्थपणे लढतोय. सरकारकडून काही प्रश्नांची उत्तरं टाळली जातात. विकासाच्या अनेक प्रश्नांना सरकारकडे उत्तरं नाहीत. सोलापुरात लाठीचार्ज करण्याची नामुष्की पोलिसांवर आली. भिडे गुरुजी यांनी काय बोललं हे सांगण्याचीसुद्धा लाज वाटते. देशवासीयांना लाच वाटेल असं वक्तव्य भिडे गुरुजी यांनी केलं. सरकार पक्ष हा भिडे गुरुजी यांना पाठीशी घालतो. भिडे गुरुजी सारख्या व्यक्तिमत्त्वाला गुरुजी म्हणावे की नाही, याचा विचार केला पाहिजे, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलं.

महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. राज्यात पुन्हा एकदा वज्रमूठ सभा होणार असल्याचंही थोरात म्हणाले.

15 ऑगस्टनंतर महाविकास आघाडीचे दौरे

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अंबादास दानवे म्हणाले, 15 ऑगस्टनंतर महाविकासआघाडीचे दौरे सुरू होणार आहेत. महाराष्ट्राच्या चारही कोपऱ्यात महाविकास आघाडीचे नेते फिरणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात सर्व नेते राज्यात फिरणार आहेत. पावसाळ्यानंतर व्रजमूठ सभा होणार आहेत. पक्ष फोडून सत्ता स्थापन होवू शकत नाही, असंही अंबादास दानवे यांनी सुनावलं.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान