ऑनलाईन बिल भरत असाल तर सावधान; अदानी इलेक्ट्रिसिटीचे ग्राहकांना आवाहन

| Updated on: May 24, 2022 | 10:06 AM

ऑनलाईन वीजबिल भरताना फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वतीने आपल्या ग्राहकांना करण्यात आले आहे.

ऑनलाईन बिल भरत असाल तर सावधान; अदानी इलेक्ट्रिसिटीचे ग्राहकांना आवाहन
संग्रहित छायाचित्र
Follow us on

मुंबई : सध्या डिजिटल (Digital) व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आपन अनेक व्यवहार जसे फोन बिल (Phone bill) भरणे, गॅस बूक करणे, इलेक्ट्रिसिटीचे बिल भरणे अशी सर्व कामे ऑनलाईनच करत असतो. मात्र हे सर्व करत असताना आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर वीजबिलाचा भरणा ऑनलाईन करताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन अदानी इलेक्ट्रिसिटीच्या (Adani Electricity) वतीने करण्यात आले आहे. मुंबई उपनगरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटिचे बिल हे ऑनलाईन भरतात. मात्र यामध्ये अनेकांची फसवणूक झाल्येचे समोर आले आहे. त्यानंतर बिलाचा भरणा ऑनलाईन करताना काळजी घेण्याचे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. फसवणूक टाळण्यासाठी कंपनीच्या सुरक्षीत पेमेंट गेटवेद्वारेच बिल भरावे. अनोळखी ई-मेल, एसएमएसद्वारे आलेल्या लिंकवर बिल भरू नये. आपला ओटीपी इतरांना शेअर करू नये असे देखील कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने नेमके काय म्हटले?

मुंबई उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटीचे बहुतांश ग्राहक हे वीजबिलाचा ऑनलाईनच भरणात करतात. मात्र वीजबिल ऑनलाईन भरत असताना अनेकदा ग्राहकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आले. तशा तक्रारी देखील कंपनीला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरताना सावधगिरी बाळगावी. फसवणूक टाळण्यासाठी कंपनीच्या सुरक्षीत पेमेंट गेटवेद्वारेच बिल भरावे. अनोळखी ई-मेल, एसएमएसद्वारे आलेल्या लिंकवर बिल भरू नये. आपला ओटीपी इतरांना शेअर करू नये. बिल भरल्यानंतर ते कंपनीच्या खात्यात जमा झाले आहे का याबाबतची खात्री करावी, असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

एसबीआय बँकेंच्या ग्राहकांना मॅसेज

दरम्यान सध्या असाच एक प्रकार समोर येत आहे. सध्या जे एसबीआय बँकेचे ग्राहक आहेत. त्यांना वेगवेगळ्या नंबरद्वारे मॅसेज पाठवण्यात येत आहे. या मॅसेजद्वारे एक लिंक सेंड करण्यात येते. तुमचे बँक खाते ब्लॉक झाले आहे. ते ओपन करण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा असा या मॅसेजमधील मजकूर असतो. मात्र अशा कोणत्याही मॅसेजद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन पीआयबीद्वारे करण्यात आले आहे. असा काही मॅसेज तुम्हाला आल्यास त्याला प्रतिसाद न देता तो डिलीट करावा. तुमची एक चूक देखील तुम्हाला मोठी महागात पडू शकते. तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले जाऊ शकतात, असे देखील पीआयबीने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा