AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Financial fraud : सावधान! जर तुम्हालाही आला असेल ‘हा’ मॅसेज तर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे

सध्या सगळीकडे एक मॅसेज फिरत आहे. या मॅसेजद्वारे तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवण्यात येत आहे. या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे. मात्र अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन पीआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.

Financial fraud : सावधान! जर तुम्हालाही आला असेल 'हा' मॅसेज तर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 24, 2022 | 8:49 AM
Share

मुंबई : सध्या भारतामध्ये डिजिटल इकोनॉमीचा (Digital Economy) झपाट्याने प्रसार होत आहे. अनेक जण पैशांच्या रोकड व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांनाच प्राधान्य देतात. मात्र डिजिटल व्यवहारांमध्ये बँकिंग फ्रॉडचा (Banking Fraud) धोका देखील वाढला आहे. आरोपी तुमच्या बँक खात्यातून (Bank Account) पैसे काढण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतात. अशा परिस्थितीमध्ये सर्तक राहण्याची आवश्यकता असते. तुमची एक चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये एसबीआय बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज पाठवण्यात येत आहे. हा मॅसेज सरकारकडून पाठवण्यात आला असून, त्यावर क्लीक करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र असा कोणताही मॅसेज सरकारकडून पाठवण्यात आला नसल्याचे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या मॅसजमध्ये दिलेली लिंक ओपन न करता आपल्या मोबाईमध्ये मॅसेज आल्यास तो लगेच डिलीट करावा असे आवाहन देखील बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मॅसेजद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका

सध्या एसबीआय ग्राहकांच्या मोबाईवर एक मॅसेज पाठवण्यात येत आहे. या मॅसेजद्वारे ग्राहकांना एक लिंक सेंड करण्यात येत आहे. हा मॅसेज सरकारने पाठवला असून, त्या लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन केले जात आहे. तुमचे बँक खाते ब्लॉक झाले आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा असा या मॅसेजमधील मजकूर आहे. मात्र याबाबत पीआबीकडून खुलासा करण्यात आला आहे. बँकेच्या वतीने असा कोणताही मॅसेज पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे तुम्ही या लिंकवर क्लिक करू नका. हा मॅसेज आल्यास लगेच डिलिट करा असे आवाहन पीआयाबीने केले आहे. तसेच जर तुम्हाला या संदर्भात कोणाचा फोन आला तर त्याला देखील प्रतिसाद देऊ नका असे देखील पीआयबीने म्हटले आहे.

‘या’ ईमेलवर संबंधित मॅसेजची माहिती द्या

या मॅसेजबाबत पीआयबीकडून ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये पीआयबीने म्हटले आहे की, तुम्हाला जर असा मॅसेज आला तर त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नका. तुम्हाला तुमची एक चूक महागात पडू शकते. तुमच्या बँक खात्यातील पैसे परस्पर काढले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर असा मॅसेज आला तर तुम्ही त्याला प्रतिसाद न देता report.phishing@sbi.co.in या इमेलवर त्या मॅसेजबाबतची माहिती द्या. माहिती मिळाल्यानंतर बँक अशा प्रकरणात तातडीने दखल घेऊ शकते. तसेच तुम्हाला फोनद्वारे कोणीही तुमच्या बँकेची डिटेल्स मागत असेल तर ती त्याला देऊ नका, असे आवाहन देखील पीआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.