ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी बेस्टच्या प्रीमियम सेवेचा विस्तार, या नव्या मार्गांवर धावणार

बेस्टने विमान प्रवासी तसेच कॉर्पोरेट कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ओला-उबरच्या धर्तीवर प्रिमियम बस सेवा गेल्यावर्षी सुरू केली होती. या बसेसच्या सेवेचा आता विस्तार करण्यात आला आहे.

ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी बेस्टच्या प्रीमियम सेवेचा विस्तार, या नव्या मार्गांवर धावणार
best premium busImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 9:14 PM

मुंबई : बेस्टने ओला आणि उबरच्या धर्तीची वातानुकुलित आणि मोबाईलवरुन ‘चलो अ‍ॅप’ने तिकीट आरक्षित करता येणारी आरामदायी वातानुकूलित प्रीमियम बस सेवा गेल्यावर्षी 12 डिसेंबर पासून आधी बीकेसी ते ठाणे आणि नंतर मुंबई विमानतळ ते खारघर आणि कफपरेड सुरु केली होती. बेस्टच्या ताफ्यात आधी 60 प्रीमियम बसेस होत्या आता नव्या 40 बसेस ताफ्यात दाखल झाल्याने या बससेवेचा विस्तार करण्यात आला आहे.

 नवीन मार्गावर धावणार 

खारघर-बीकेसी मार्ग क्र. एस-114 स.7 आणि स.8.30 वाजता तसेच सायं. 5 आणि रा. 7.30 वा. सुटणार आहे. या बसेसचे तिकीट 134 रुपयांपासून सुरू होईल. ही बस खारघर, नेरूळ, सानपाडा, वाशी, बीकेसी अशी धावणार आहे.

बेलापूर – बीकेसी ही एस-115 ही बस स. 7 आणि स.8.30 वा. तसेच सायं. 5 आणि रा.7.30 वा. सुटणार आहे. या बसचे तिकीट 134 रुपयांपासून सुरू होईल.

खारघर-अंधेरी ही एस-116 ही बस स. 7 आणि स.8.30 वा. तसेच सायं. 5 आणि रा.7.30 वा. सुटणार आहे. हीचे तिकीट 149 रुपयांपासून सुरू होईल.

बेलापूर-अंधेरी एस-117 ही बस स.7 आणि स.8.30 वाजता तसेच सायं. 5 आणि रा.7.30 वा. सुटणार आहे. या बसचे तिकीट 149 रुपयांपासून सुरू होईल, ती बेलापूर, नेरूळ, सानपाडा, वाशी, अंधेरी अशी धावेल.

लोढा अमारा ( ठाणे ) – अंधेरी ही मार्ग क्र एस-118 बस स.7 आणि स.8.30 वाजता तसेच सायं. 5 आणि रा.7.30 वा. सुटणार आहे. या बसचे तिकीट 134 रुपयांपासून सुरू होईलही बस लोढा अमारा, पाटील पाडा, मुलुंड चेकनाका, सीप्झ, अंधेरी मार्गावरून धावेल.

कुर्ला-बीकेसी ही मार्ग क्र. 119 ही बस स.9 वा. आणि रात्री 7 वा. सुटेल. हीचे तिकीट 30 रुपयांपासून सुरू होईल. ही बस कुर्ला स्थानक आणि बीकेसी अशी धावेल.

गुंदवली-बीकेसी ( व्हाया कालिना ) मार्ग क्र. एस-120 ही बस स.9 वा. आणि रात्री 7 वा. सुटेल. हीचे तिकीट 64 रुपयांपासून सुरु होईल ही बस गुंदवली मेट्रो, कालिना, बीकेसी अशी धावेल.

अंधेरी-सिप्झ मार्ग क्र. एस-121 ही बस स.9 वा. आणि रात्री 7 वा. सुटेल. हीचे तिकीट 30 रुपयांपासून सुरु होईल, ही बस अंधेरी स्थानक, गुंदवली आणि सीप्झ अशी धावेल. या बसेस पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांना सवलत असेल.

हे पाहा वेळापत्रक

premium bus TIME TABLE

premium bus TIME TABLE

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.