भंडारा दुर्घटनेत भाजपची मागणी भाई जगताप यांनाही मान्य, म्हणाले…

आमच्या सरकारने लगेच मदत दिली ही चांगली बाबा आहे. पण पाच ऐवजी 10 लाख मदत केली पाहिजे असं माझं व्ययक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे.

भंडारा दुर्घटनेत भाजपची मागणी भाई जगताप यांनाही मान्य, म्हणाले...
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 7:09 PM

मुंबई : भंडाऱ्यामध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. यामध्ये लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. आमच्या सरकारने लगेच मदत दिली ही चांगली बाबा आहे. पण पाच ऐवजी 10 लाख मदत केली पाहिजे असं माझं व्ययक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे. खरंतर, या घटनेवर ठाकरे सरकारने प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. पण 10 लाख मदत मिळायला हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला भाई जगतापांनीही पाठिंबा दिल्याच्या राजकीय चर्चा सध्या रंगल्या आहेत. (bhandara fire 10 lakh should be given instead of five said Mumbai Congress president Bhai Jagtap)

भाई जगताप पुढे म्हणाले की, पैश्याने ही बालक परत मिळणार नाही पण त्या आई-वडिलांना एक आधार मिळेल. सर्व सरकारी रुग्णालयाचं ऑडिट झालं पाहिजे. आम्ही सुद्धा सभागृहात म्हणत असतो ऑडिट झालं पाहिजे. सरकार कोणाचं असो अशा घटना थांबल्या पाहिजे असं भाई जगतापांनी म्हटलं आहे.

‘मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी’

भंडारामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू ICU मध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे.

इतकंच नाही तर फायर ऑडिट का झालं नाही याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही. मात्र, ज्यापद्धतीने दावे केले जात आहे त्यात अर्थ नसून ते चुकीचे आहेत असं म्हणत मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उद्याच्या उद्या 5 लाख, दोषींना सोडणार नाही : राजेश टोपे

या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्याच्या उद्या मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ही दुर्घटना घडल्यानंतर राजेश टोपे, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. (bhandara fire 10 lakh should be given instead of five said Mumbai Congress president Bhai Jagtap)

संबंधित बातम्या : 

भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

BREAKING | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

(bhandara fire 10 lakh should be given instead of five said Mumbai Congress president Bhai Jagtap)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.