AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या धोरणांविरोधात आज ‘भारत बंद’ची हाक, कोणकोणत्या सेवांवर परिणाम?

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात देशभरातील विरोधी पक्षाच्या कामगार संघटनांनी बुधवारी (8 जानेवारी) भारत बंदचं आवाहन केलं आहे (Bharat Band).

सरकारच्या धोरणांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक, कोणकोणत्या सेवांवर परिणाम?
26 Feb Bharat Bandh
| Updated on: Jan 08, 2020 | 9:02 AM
Share

मुंबई : केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात देशभरातील विरोधी पक्षाच्या कामगार संघटनांनी बुधवारी (8 जानेवारी) भारत बंदचं आवाहन केलं आहे (Bharat Band). मुंबईतील चाकरमानी नेहमीप्रमाणे कामावर जायला निघाले आहेत, विध्यार्थी शाळा कॉलेजला जात आहेत. मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकल आणि बेस्ट बस सेवाही सुरळीत आहे. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे (Bharat Band).

देशातील वेगवेगळ्या कामगार संघटनांनी आज भारत बंदचं आवाहन केलं. त्यामुळे आज बँकिंग, ट्रांसपोर्ट आणि इतर सुविधांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. सेंट्रल ट्रेड युनियन आणि बँक युनियन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात प्रदर्शन करतील. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर या बंदचं आवाहन करण्यात आल्याचा दावा या कामगार संघटनांनी केला आहे. या बंदमध्ये 25 कोटी लोकं सहभागी होऊ शकतात, असा दावा केला जात आहे. मात्र, या देशव्यापी बंदमुळे सामान्य जनतेची गैरसोय होऊ शकते.

बँकिंग सुविधेवर काय परिणाम होणार?

देशव्यापी भारत बंदचा बँकिंग सुविधेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. इंडियन बँक्स असोसिएशन (आईबीए) ने सांगितलं की, 8 जानेवारीला होणाऱ्या भारत बंदमध्ये 6 बँक यूनियन सहभाग घेतील. बँकिंग सुविधा तसेच, एटीएम, बँकेतून पैसे काढणे, जमा करणे यासारख्या सुविधांवर या बंदचा परिणाम होईल. मात्र, ऑनलाइन ट्रान्झॅक्शनवर याचा काहीही परिणाम होणार नाही. तसेच, खाजगी बँकावरही याचा परिणाम होणार नाही.

शाळा कॉलेजांवर काय परिणाम होणार?

सध्या या बंदचा शाळा-कॉलेजांवर काहीही परिणाम झालेला नाही. शाळा-कॉलेजांना सुट्टीही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी सकाळपासूनच शाळा-कॉलोजात जायला निघाले आहेत.

8 जानेवारीला यूपीटीईटी 2019, जेईई मेन्स आणि आईसीएआर एनईटी सारख्या महत्त्वाच्या परिक्षा आहेत. जर ट्रान्सपोर्ट सुविधांवर या बंदचा परिणाम झाला तर विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, बंदमुळे परिक्षा रद्द करण्यात आलेल्या नाही.

वाहतुकिच्या सुविधांवर काय परिणाम होणार ?

भारत बंदमध्ये ट्रेड यूनियन सहभागी असल्याने वाहतुकीच्या सुविधांवर या बंदचा परिणाम होणार आहे. मात्र, आपत्कालीन सुविधा, जसे दूध, पब्लिक ट्रान्सपोर्ट, औषधी, रुग्णवाहिका आणि रुग्णालयाशी संबंधित सुविधांवर याचा परिणाम होणार नाही. खाजगी टॅक्सी, ओला आणि उबरही रोजप्रमाणे काम करेल. मेट्रो सेवाही सुरु राहील, मात्र, एअरलाईन कंपन्यांकडून प्रवाशांसाठी एडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. इंडिगो, विस्तारा आणि स्पाईसजेटने प्रवाशांसाठी एडव्हायझरी जारी करत सूचित केलं की बंदमुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होऊ शकतं त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर येण्यासाठी लवकर निघावे

10 केंद्रीय कामगार संघटनांकडून भारत बंदची हाक

10 केंद्रीय कामगार संघटना INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC यांनी देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. या शिवाय, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA), BEFI, INBEF, INBOC आणि बँक कामगार सेना महासंघही या बंदमध्ये सहभागी होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाले आहे.

सरकार आर्थिक आणि जनविरोधी धोरणं लागू करत असल्याचा आरोप या संघटनानी केला आहे. त्याशिवाय, केंद्र सरकारच्या लेबर लॉविरोधातही हा बंद पुकारण्यात आला आहे. विद्यार्थी संघटनांकडून शिक्षण संस्थांकडून वाढवण्यात येणाऱ्या फीस विरोधात आंदोलन केलं जाणार आहे.

संघटनांच्या मागण्या काय?

  • पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, बेरोजगारी, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी धोरण तयार करणे.
  • मजुरांची पगारवाढ कमीतकमी महिन्याला 21 हजार रुपये असावी
  • सामाजिक आरोग्य सेवा
  • मजुरांना मीड डे मील देणे
  • 6000 रुपयांची किमान पेंशन
  • सार्वजनिक क्षेत्रात बँक विलीनीकरणाला विरोध
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.