AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मळके कपडे, दयनीय अवस्था! भाऊ डॉक्टर, वडील शिक्षक असूनही डॉक्टर होणाऱ्या मुलावर भीक मागण्याची वेळ, मन हेलावणारी घटना

२५ वर्षीय अभय सुरेश बेळकोनी हा गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून घरातून बेपत्ता झाला होता. पोलिसांनी जेव्हा त्याची आपुलकीने चौकशी केली, तेव्हा मन हेलावणारी घटना समोर आली आहे.

मळके कपडे, दयनीय अवस्था! भाऊ डॉक्टर, वडील शिक्षक असूनही डॉक्टर होणाऱ्या मुलावर भीक मागण्याची वेळ, मन हेलावणारी घटना
BeggarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 23, 2026 | 2:45 PM
Share

शिक्षक असलेले वडील, सरकारी रुग्णालयात डॉक्टर असलेला मोठा भाऊ आणि स्वतः होमिओपॅथीच्या (BHMS) तिसऱ्या वर्षात शिकणारा हुशार तरुण. अशा एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील २५ वर्षीय मुलगा अचानक मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना आढळल्याची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मात्र, मुंबईतील मालाड पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे या तरुणाची सुखरूप सुटका होऊन त्याची त्याच्या कुटुंबाशी भेट झाली आहे.

पहाटेच्या कारवाईत पोलिसांना संशय आला अन्…

नांदेड जिल्ह्यातील तामसा गावचा रहिवासी असलेला २५ वर्षीय अभय सुरेश बेळकोनी हा गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून घरातून बेपत्ता झाला होता. मुंबईत भिकाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या एका कारवाईदरम्यान, मालाड येथील एस. व्ही. रोड परिसरात पहाटेच्या वेळी बीच मार्शल अंमलदार कोमलसिंग जाधव यांना एक तरुण अत्यंत थकलेल्या आणि हतबल अवस्थेत भीक मागताना दिसला. पोलिसांनी जेव्हा त्याची आपुलकीने चौकशी केली, तेव्हा त्याने “मला गावी जायचे आहे आणि त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी मी गेल्या तीन दिवसांपासून भीक मागतोय,” असे सांगितले.

मोबाईल-बॅग चोरीला गेली आणि मानसिक संतुलन बिघडले

अभयची अवस्था पाहून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मालाड पोलिसांनी त्याला प्रेमाने खाऊपिऊ घातले आणि विश्वासात घेऊन चौकशी केली, तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आले. अभय हा अभ्यासात प्रचंड हुशार असून त्याला बारावीत तब्बल ८० टक्के गुण मिळाले होते. सध्या तो होमिओपॅथीचे उच्च शिक्षण घेत होता.

दीड-दोन महिन्यांपूर्वी तो अचानक घराबाहेर पडला. ट्रेनने प्रवास करत तो आधी इंदूरला गेला आणि तिथून पुन्हा मुंबईत आला. मात्र, या प्रवासादरम्यान त्याची शैक्षणिक कागदपत्रे, पैसे आणि मोबाईल असलेली बॅग चोरीला गेली. घरातील सदस्यांचे संपर्क क्रमांक (Contact Numbers) हरवल्यामुळे तो प्रचंड घाबरला आणि त्या धक्क्यातून त्याचे मानसिक संतुलन बिघडले. पोट भरण्यासाठी आणि घराचा रस्ता शोधण्यासाठी अखेर तो रेल्वे प्लॅटफॉर्म, बसस्टॉप आणि रस्त्यांवर भीक मागू लागला होता.

पोलीस ठाण्यातच वडिलांनी मारली घट्ट मिठी

या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मालाड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने नांदेडच्या तामसा पोलिसांशी संपर्क साधला आणि अभयच्या कुटुंबाचा शोध घेतला. अभय मुंबईत सुखरूप असल्याची माहिती मिळताच त्याचे वृद्ध वडील तातडीने मुंबईत दाखल झाले. मळके कपडे आणि अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या पोटच्या मुलाला समोर पाहताच वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी धावत जाऊन अभयला घट्ट मिठी मारली. योग्य वेळी मदत करून आपल्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवल्याबद्दल या सुशिक्षित कुटुंबाने मुंबई पोलिसांचे डोळे पुसत मनापासून आभार मानले आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ