सर्वात मोठी बातमी ! शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर, दिवाळीपूर्वीच पैसे देणार, किती मिळणार रक्कम? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात तातडीची आर्थिक मदत म्हणून ५,००० रुपये जमा करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या मदत प्रक्रियेला लागणाऱ्या वेळेमुळे, हा निर्णय बळीराजाला तात्काळ दिलासा देण्यासाठी घेण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत आर्थिक आधार मिळेल.

सर्वात मोठी बातमी ! शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर, दिवाळीपूर्वीच पैसे देणार, किती मिळणार रक्कम? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
cm devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 12:36 PM

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात येणार असून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी गेल्या 25 वर्षात राज्यात नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर होत होता. त्यानंतर शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मदत करण्यात येत होती. आपण यावेळी लवकर दुष्काळ जाहीर केला आहे. आपण यंदा दुष्काळाचा जीआर ऑक्टोबरमध्येच काढला. आज सप्लीमेंटरी जीआर काढला आहे. 12 योजना लागू केल्या आहे. आता दिवाळी येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अडचणीची आहे. त्यावर आम्ही मोठा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Loading...

दिवाळी पूर्वीच खात्यात रक्कम

दुष्काळासाठी केंद्रात कार्यप्रणाली करावी लागते. ती दिवाळीपूर्वी होणं कठिण आहे. केंद्र सरकारचे जे नियम आहे, जे टप्पे आणि तारखा आहेत, त्यामुळे हे काम एवढ्या कमी वेळात होणं शक्य नाही. ही परिस्थिती पाहून आम्ही आज मंत्रिमंडळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चर्चा केली. केंद्रातून मदत आल्यावर शेतकऱ्यांना जी मदत करायची ती केली जाणारच आहे. पण आता तातडीचा दिलासा म्हणून आणि त्यातील अग्रीम रक्कम म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये दिवाळी पूर्वी देणार आहोत. शेतकऱ्यांच्या हातात काही ना काही दिवाळीत असावे म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार आहे. दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे, अशी घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कर्जमाफीचं काम सुरू

कर्जमाफीचं काम सुरू आहे. नव्याने साडेतीन लाख शेतकऱ्यांची यादी ऑथेंटिक केली आहे. त्या यादीचे पैसे खात्यात जाणं सुरू होईल. ते कामही थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात जात आहे. पण शेतकऱ्यांना तातडीने दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us