मराठा समाजाला 3 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजप आमदार आशिष शेलार यांची ठाकरे सरकारकडे मागणी

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारकडे मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची मागणी केलीय.

मराठा समाजाला 3 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजप आमदार आशिष शेलार यांची ठाकरे सरकारकडे मागणी
आशिष शेलार, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 8:51 PM

मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारकडे मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची मागणी केलीय. “मराठा समाजाला EWS आरक्षण मिळेल असा निर्णय महाभकास आघाडीने घेतला. ही आघाडी कर्तव्यशून्य आहेच, पण कर्तृत्वशून्य हा त्यांचा परिचय आहे. आता कर्तृत्व परावलंबी आहेत हे सिद्ध झालं. कारण 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण दिलं, त्यात ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय? ते मोदी सरकारने दिलंय. त्यामुळे हे ठाकरे सरकार कर्तृत्वावरही परावलंबी आहे,” असा हल्ला आशिष शेलार यांनी राज्यातील आघाडी सरकारवर केला (BJP leader demand 3 thousand crore package for Maratha community ).

मराठा विद्यार्थ्यांना OBC च्या सुविधा द्या

आशिष शेलार म्हणाले, “गायकवाड कमिशनने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल सिद्ध करुन मराठा आरक्षण मिळालं. मात्र, आघाडी सरकारनं EWS आरक्षण जाहीर केलं. जोपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल.EWS मध्ये टाकल्यामुळे मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, अशी मांडणी ठाकरे सरकारने करु नये. OBC ला मिळणाऱ्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना मिळाव्या. यासाठी 3 हजार कोटीचं पॅकेज जाहीर करावं.”

शिवसेनेकडून मराठा मोर्चाची खिल्ली

“शिवसेनेने भावनाशून्यपणे मराठा मोर्चाची खिल्ली उडवली होती. गायकवाड आयोगाची बाजू मांडली नाही यावरुन कर्तव्यशून्य होता हे सिद्ध झालं. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण स्थगिती नाकारली. त्या गायकवाड आयोगाला तुम्ही गाळात टाकलंत. आता मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणमध्ये टाकलं असलं, तरी सामाजिक मागासलेपण गाळू नका,” अशी मागणी शेलार यांनी मविआ सरकारकडे केली.

ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नये

“सरकार ओबीसी राजकीय आरक्षण टिकवू शकलं नाही. मविआनेच स्थानिक स्वराज्य संस्थातील अतिरिक्त आरक्षणाचा खून पाडला. आरक्षणाचा मुडदा पडल्यानंतर वडेट्टीवार-भुजबळ हे सत्तेत मदमस्त कसे राहू शकतात? ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नये, ही आमची भूमिका आहे,” असंही आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा :

भाजपाच्या आरक्षणविरोधी कुटील डावाची पोलखोल करणार; काँग्रेसचे डॉ. संजय लाखे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर

आरक्षणासाठी एक व्हा, समरजितसिंह घाटगे यांची मराठा समाजाला हाक

शरद पवारांकडूनच मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींचं आरक्षण अबाधित; नवाब मलिकांचं मोठं विधान

व्हिडीओ पाहा :

BJP leader demand 3 thousand crore package for Maratha community

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.