AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah : मोदींनी GDP 10 नंबरवरून 4 नंबरवर आणला – अमित शाह

Amit Shah : "गुजराती मारवाडी संस्कृती केंद्र माधवबागने बनवाव. आपल्या पूर्वजांनी संस्थेला खूप संपत्ती दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीशिवाय आपण याठिकाणी काम करू शकतो" असं अमित शाह म्हणाले.

Amit Shah : मोदींनी GDP 10 नंबरवरून 4 नंबरवर आणला - अमित शाह
amit shah
| Updated on: May 27, 2025 | 12:48 PM
Share

“150 वर्ष एक संस्था चालवणं सोप्पं नाही. मी जुन्या संस्था चालवल्या आहेत. इथ मुंबईत एवढी मोठी संस्था चालवणं सोप्पं नाही, त्यामुळे माधवबागच्या ट्रस्टीचं अभिनंदन करतो” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. “देवेंद्र फडणवीस म्हणाले की, करोडो रुपयांच दान करण्यात आलं. आज जर त्याची किंमत केली, तर अरबो रुपये किंमत होईल. 1875 साली इंग्रज सरकार असताना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी धार्मिक संस्था उभा करण सोप नव्हतं” असं अमित शाह म्हणाले. “अनेकांना माहिती नसेल, माझा जन्म मुंबईचा आहे. मी या मंदिरात अनेकवेळा याठिकाणी आरतीसाठी येत होतो. त्यावेळी याठिकाणी एक वाडी होती आणि एक हॉल होता. त्यावेळी कमी पैशात याठिकाणी लग्न लावलं जात होतं. संस्था मदत करत होती” असं अमित शाह म्हणाले.

“याठिकाणी अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम होतं होते. याठिकाणी असणारी मूर्ती ही अतिशय उत्तम आहे. शास्त्रकोत पद्धतीने याठिकाणी पूजा होत आहे. माझा वैष्णव कुटुंबात जन्म झाला आहे. याठिकाणी एक संस्कृत शिकवणारी शाळा होती. 150 वर्ष जुन्या संस्थेने मध्यमवर्गीयांच्या अडचणी दूर केल्या. याठिकाणी आपली मातृभाषा शिकवणारे केंद्र बनवू शकतो. कारण आता आपण गुजराती, पंजाबी, हिंदी कोणत्याही कुटुंबात जावा, मातृभाषेपेक्षा इंग्रजी बोलणारे लोक जास्त भेटतात” असं अमित शाह म्हणाले.

‘गुजराती मारवाडी संस्कृती केंद्र माधवबागने बनवाव’

“माझ म्हणणं आहे की, इथं आपण आपली मातृभाषा शिकवणारे केंद्र बनवू शकतो. उपनिषेद शिकवू शकतो. गुजराती मारवाडी संस्कृती केंद्र माधवबागने बनवाव. आपल्या पूर्वजांनी संस्थेला खूप संपत्ती दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीशिवाय आपण याठिकाणी काम करू शकतो” असं अमित शाह म्हणाले.

‘मोदींनी काय केलं तर…’

“मोदींनी काय केलं तर जीडीपी 10 नंबरवरून 4 नंबरवर आणला. आपली सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपण सडेतोड उत्तर दिलं. आपली सुरक्षा आता भक्कम केली आहे. जेणेकरून आपण आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर देऊ शकतो” असं अमित शाह म्हणाले.

‘पासपोर्टची किंमत वाढवली’

“मला फ्रेंच डिप्लोमॅट भेटले. मी त्यांना विचारलं 10 वर्षात भारतात काय बदललं अस तुम्हाला वाटतं. ते मला म्हणाले मोदींनी पासपोर्टची किंमत वाढवली. कोणत्याही देशात जा आपलं हसत-हसत स्वागत केलं जातं. साडेपाचशे वर्ष भगवान राम तंबूमध्ये होते. त्यांना मंदिरात आणण्यात आलं. काशी विश्वेशर कॉरिडोर बनवलं. योगा आणि आयुर्वेद जगभरात घेऊन गेले. हे सगळें परिवर्तन मोदींनी केलं. देशाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल” असा विश्वास अमित शाहनी सांगितलं.

“ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरच महत्व सगळ्या जगाला दाखवलं. सगळ्यात जास्त सिंदूर हा शब्द गुगवलवर सर्च केला. 10 कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला” असं अमित शाह म्हणाले.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.