AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फांदीवर बसलेल्‍यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाहीतर…’, नारायण राणे यांनी रामदास कदम यांना सुनावलं

शिवसेना नेते रामदास कदम यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरुन भाजपला इशारा दिलेला. केसाने गळा कापू नका, असं रामदास कदम म्हणाले होते. त्यांच्या टीकेला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'फांदीवर बसलेल्‍यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाहीतर...', नारायण राणे यांनी रामदास कदम यांना सुनावलं
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 08, 2024 | 6:18 PM
Share

मुंबई | 8 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. भाजप तब्बल 35 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 8 आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळू शकतात, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे या जागावाटपावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला. केसाने गळा कापू नका, असं रामदास कदम भाजपला उद्देशून म्हणाले. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं असतानाच आता भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील रामदास कदम यांना सुनावलं आहे. “फांदीवर बसलेल्‍यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाहीतर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून रामराम म्‍हणण्‍याची वेळ येईल”, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

“आमचे मित्रपक्ष आणि सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाहीतर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून रामराम म्‍हणण्‍याची वेळ येईल”, अशा कडक शब्दांत नारायण राणे यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

रामदास कदम काय म्हणाले होते?

“महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून इथे जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद चाललं आहे. माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. मोदी-शाह यांच्याबाबत संबंध वेगळा मेसेज आपण भाजपकडून देत आहात. याचं भानदेखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे”, असं रामदास कदम म्हणाले होते.

रामदास कदम यांना फडणवीसांचं प्रत्युत्तर

रामदास कदम यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. “मी इतके वर्ष रामदास भाईंना ओळखतो. अशाप्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांना सवय आहे. त्यांची टोकाने बोलण्याची सवय आहे. ते कधीकधी रागानेदेखील बोलतात. भाजपने शिवसेनेचा नेहमी सन्मानच केलाय. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आम्ही 115 आहोत, तरीदेखील आमच्याबरोबर आलेल्या शिंदेना मुख्यमंत्री केलं. कारण खरी शिवसेना आमच्याबरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल