26/11 हल्ल्याची पुन्हा चौकशी करा : भाजप आमदाराची मागणी

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

26/11 हल्ल्याची पुन्हा चौकशी करा : भाजप आमदाराची मागणी
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 3:11 PM

मुंबई : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे (Investigate 26/11 attack again). मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत भातखळकर यांनी ही मागणी केली आहे. या पुस्तकात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला हिंदू दहशतवादी भासवण्याचा प्रयत्न झाला, असा उल्लेख मारिया यांनी केला आहे (Investigate 26/11 attack again). या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी भातखळकर यांनी मागणी केली आहे.

राकेश मारियांच्या आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट

‘लेट मी से इट नाऊ’ हे राकेश मारिया यांचं आत्मचरित्र नुकतंच वाचकांच्या भेटीला आलं आहे. राकेश मारियांच्या या आत्मचरित्रात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. मुंबईवरील 26/11 हल्ल्याबाबतही मारियांनी गौप्यस्फोट केला. मारिया हे 26/11 हल्ल्याचे तपास अधिकारी होते. त्यांच्या दाव्यांनुसार, “जर लष्कर-ए-तोयबाचा प्लॅन यशस्वी झाला असता, तर सर्व पेपर आणि टीव्ही चॅनल्सवर ‘हिंदू दहशतवादी’ अशा हेडलाईन्स दिसल्या असत्या”.

“जर अजमल कसाब घटनास्थळीच मारला गेला असता तर कदाचित जगाने त्याला हिंदू दहशतवादीचं मानलं असतं. कारण त्याला हिंदू दहशतवादी भासवण्याचा कट लष्कर-ए-तोयबाने केला होता.”

हिंदू दहशतवादी बनवून पाठवलं

मारियांच्या मते, “पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने 26/11 हल्ल्याला हिंदू दहशतवादाचं रुप देण्याचा कट रचला होता. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने आयएसआयला साथ दिली होती. आयएसआयने अजमल कसाबसह सर्व 10 हल्लेखोरांना बनवाट आयकर्ड देऊन, हिंदू म्हणून मुंबईला पाठवलं होतं”

कसाबकडे बंगळुरुच्या तरुणाचं आयकार्ड

पोलिसांना कसाबकडे बंगळुरुच्या समीर दिनेश चौधरीच्या नावाने बनावट आयकार्ड मिळालं होतं. हिंदू भासवण्यासाठी कसाबने आपल्या डाव्या हातात धागाही बांधला होता.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.