BJP Protest : चेंबूर पोलिस स्टेशनबाहेर भाजपची जोरदार निदर्शने; रथावरील हल्लेखोरांच्या अटकेची मागणी

या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या एका संशयित आरोपीने धडधडीत एका वाढदिवसाच्या पार्टीलाही हजेरी लावली आहे. तरीही पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नाही. याचा अर्थ राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नाही असा आरोप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.

BJP Protest : चेंबूर पोलिस स्टेशनबाहेर भाजपची जोरदार निदर्शने; रथावरील हल्लेखोरांच्या अटकेची मागणी
चेंबूर पोलिस स्टेशनबाहेर भाजपची जोरदार निदर्शनेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 9:20 PM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल आम्ही रोज करतोय आणि ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ असल्यानेच असे हल्ले सुरू आहेत. विरोधकांनी कितीही हल्ले केले तरी पोलखोल होणारच आहे. येणाऱ्या 24 तासांत पोलखोल रथावर हल्ला (Attack) करणाऱ्यांना पकडले गेले नाही तर निर्माण होणाऱ्या संघर्षमय परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिला आहे. चेंबूरमध्ये भाजपाच्या पोलखोल यात्रेतील रथावर अज्ञातांनी दगडफेक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याचा आरोप करत भाजपाने चेंबूर पोलीस ठाणे येथे आज निदर्शने केली. (BJP protests outside Chembur police station for arresting attackers on chariots)

भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वात चेंबूर पोलिस स्थानक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भ्याड हल्ल्यामागील खरा चेहरा समोर आणण्याची मागणी

घाबरलेली शिवसेना जाणूनबुजून भाजपाच्या पोलखोल अभियानात बाधा आणत आहे. पोलखोल अभियानाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये पोटशूळ उठले आहे. म्हणूनच असे भ्याड हल्ले केले जात आहेत. हिंमत असेल तर विरोधकांनी आमनेसामने येऊन दाखवावे. एका स्थानिक आमदाराच्या मुलाने पोलखोल रथाची तोडफोड केल्याचा आमचा आरोप आहे. ते ठळकपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाले आहे. रात्री एक वाजल्यानंतर हे कृत्य झालेले आहे. तसेच या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या एका संशयित आरोपीने धडधडीत एका वाढदिवसाच्या पार्टीलाही हजेरी लावली आहे. तरीही पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नाही. याचा अर्थ राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नाही असा आरोप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. या भ्याड हल्ल्यामागील खरा चेहरा समोर आणण्याची मागणीही आमदार लोढा यांनी यावेळी केली. (BJP protests outside Chembur police station for arresting attackers on chariots)

इतर बातम्या

ब्राह्मण समाज सावलीसारखा माझ्या सोबत; कोणाच्याही भावना दुखविण्याचा हेतू नाही धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण

Maharashtra load shading : जिथं वसुली कमी तिथं भारनियमन जास्त, ऊर्जी मंत्री राऊत म्हणतात, आता लोडशेडींगचं वेळापत्रक देणार!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.