Navnath Ban: त्यांना ‘वार’ लावून वसुलीची सवय, शरद पवार यांच्यावर टीका करताच नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्याविरोधात बॉम्ब

Navnath Ban on Congress Vijay Vadettiwar : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावरून देशभरात गोंधळ सुरू आहे. इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी भाजपला समर्थन देताच राजकीय यादवी माजली आहे. त्यात आता भाजपनेही उडी घेतली आहे.

Navnath Ban: त्यांना वार लावून वसुलीची सवय, शरद पवार यांच्यावर टीका करताच नवनाथ बन यांचा काँग्रेस नेत्याविरोधात बॉम्ब
नवनाथ बन यांची काँग्रेस नेत्यावर विखारी टीका
| Updated on: Nov 28, 2026 | 11:46 AM

Navnath Ban on Congress Vijay Vadettiwar : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावरून देशभरात गदारोळ माजला आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेने सडकून टीका केली आहे. पवार यांच्यावर टीका होताच, भाजप मैदानात उतरली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार यांच्यावर जहरी टीका

Loading...

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं महिला आरक्षणाला पाठिंबा द्यायचा धोरणात्मक निर्णय घेतला. परंतु, संविधान विरोधी काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार हे त्यांच्यावर टीका करत आहेत. खरंतर महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा स्थापन झालं होतं. तेव्हा शरद पवार यांच्यामुळेच काँग्रेस सत्तेवर आली होती. पवार साहेबांमुळेच विजय वडेट्टीवार मंत्री झाले होते. पण आज त्यांच्यावरच टीका करण्यापर्यंतची मजल विजय वडेट्टीवार यांची गेली आहे, अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे.

त्यांना ‘वार’ लावून वसुलीची सवय

पवार साहेब हे सुरूवातीपासूनच महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिला आरक्षण लागू केलं आणि आज धोरणात्मकदृष्ट्या ते या विधेयकाला पाठिंबा देत आहेत. वडेट्टीवार हे त्यांच्या विरोधात टीका करत आहेत, काँग्रेस संविधान विरोधी आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळायला हवे. संविधानानुसार, लोकसंख्येनुसार खासदारांच्या जागा वाढायला हव्यात. पण त्याला काँग्रेस आणि वडेट्टीवार विरोध करत आहेत. वडेट्टीवारांना ‘वार’ लावून वसुलीची सवय आहे. त्यामुळेच ते आशा पद्धतीने धोरणात्मक निर्णयावर विरोध करत आहेत. ते महिला आरक्षणाला विरोध करत आहेत, अशी भूमिका नवनाथ बन यांनी जाहीर केली आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार?

शरद पवार यांच्या पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने भूमिका घेतल्याच्या चर्चेवरून वडेट्टीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. या विधेयकामुळे लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला. तर पवारांच्या पक्षाची भूमिका केवळ सत्तेसाठी असल्याचे म्हणत त्यांनी पवार आणि सुळे यांच्यावर टीका केली. तर पवार यांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us