AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Loksabha ByPoll: नांदेडमध्ये मोठी उलथापालथ, शेवटच्या फेरीत असा झाला बदल

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

Nanded Loksabha ByPoll: नांदेडमध्ये मोठी उलथापालथ, शेवटच्या फेरीत असा झाला बदल
Narendra Modi
| Updated on: Nov 24, 2024 | 11:47 AM
Share

Nanded Lok Sabha By Election Result 2024 Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले. महायुतीचा विजयाचा हा पॅटर्न लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत दिसला. नांदेड लोकसभा मतदार संघात पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला होता. परंतु पाच महिन्यात या निकालात मोठी उलथापालथ झाली आहे. पाच महिन्यानंतर ही निवडणूक अटीतटीची झाली. शेवटच्या फेरीत या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण 1457 मतांनी विजयी झाले. भाजपचे डॉ. संतुक हंबार्डे यांचा पराभव झाला. काँग्रेसला 586788 मते तर भाजपला 585331 मते मिळाली.

असा आला निकाल

नांदेड लोकसभा मतदार संघात एप्रिल मे महिन्यांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांत वसंत चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण मैदानात होते. भाजपकडून डॉ. संतुक हंबार्डे मैदानात होते.

मागील निवडणुकीत काय झाले

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत विधानसभेच्या 6 जागा आहेत. या जागेवर १९५२ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे शंकरराव तेलकीकर विजयी झाले होते. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसने देवराव नामदेवराव कांबळे यांना तिकीट दिले आणि ते विजयी झाले. १९६२ मध्ये काँग्रेसचे तुळशीदास जाधव विजयी झाले. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसने येथून उमेदवार बदलून व्यंकटराव तिरोडकर यांना उभे केले आणि ते विजयीही झाले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.