AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाऊदच्या साम्राज्याला हादरा, कुख्यात ड्रग्स तस्कर सलीम डोलाच्या पंटरला दणका, फैसल शेखसह 10 जणांविरोधात ED चे आरोपपत्र

Dawood Ibrahim- Salim Dola-Faisal Shaikh MD Drugs: दाऊदच्या साम्राज्याला सुरूंग लावण्याचे काम गेल्या काही दिवसात नेटाने करण्यात येत आहे. त्याची पंटर गँग आता चांगलीच हादरली आहे. ड्रग्सच्या माध्यमातून कमाई करणाऱ्या दाऊदला आता अजून एक झटका बसला आहे. कुख्यात ड्रग्स तस्कर सलीम डोलाच्या पंटरविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दाऊदच्या साम्राज्याला हादरा, कुख्यात ड्रग्स तस्कर सलीम डोलाच्या पंटरला दणका, फैसल शेखसह 10 जणांविरोधात ED चे आरोपपत्र
फैसल शेखसह 10 जणांविरोधात ED चे आरोपपत्र
| Updated on: Jul 30, 2026 | 9:02 AM
Share

दाऊद इब्राहिमच्या देशातील काळ्या धंद्यांना जोरदार चपराक लगावण्यात आला आहे. अवैध व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल दाऊदची गँग करते. यामध्ये ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट चालवले जाते. गेल्यावर्षी अंमलबजावणी संचालनालयाने, ईडीने दाऊदचा निकटवर्तीय सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कवर मुंबईत 8 ठिकाणी धाडी घातल्या होत्या. याप्रकरणात डोलाचा एमडी ड्रग्ज तस्कर फैसल शेख याच्यासह त्याची पत्नी अल्फिया शेख आणि इतर 8 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. या धाडसत्रामुळे दाऊदच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला होता. या दहा जणांविरोधात ED ने आता आरोपपत्र दाखल केले आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB) च्या कारवाई आधारे आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने धडक कारवाई केली आहे. मेफेड्रॉन(MD) या घातक ड्रग्ज तस्करी प्रकरणात गेल्यावर्षी दाऊदच्या पंटरवर मोठी कारवाई करण्यात आली होती. फैसल शेख हा सलीम डोलासाठी काम करत होता. त्याची पत्नी अल्फिया शेखही या गँगमध्ये होती. या दोघांसह इतर आठ जणांना अटक करण्यात आली होती. ड्रग्ज तस्करी रॅकेटची सूत्र ते हलवत होते. सामिया खान, नासिर यासिन खान आणि इतर जण एमडी ड्रग्जची विक्री करत होते. ग्राहकांना शोधण्याचे काम त्यांचे होते. फैसल आणि अल्फिया ड्रग्ज विक्रीतून झालेली कमाई त्यांच्या बँक खात्यात ठेवत होते. त्याची संपूर्ण कुंडली ईडीने बाहेर काढली आहे.

गुन्ह्यासाठी विविध बँक खात्याचा वापर

शेख दाम्पत्य जमा झालेला पैसा त्यांचा एक साथीदार फैजान मोहम्मद शफी शेख जो, फैज कॉम्प्लेक्स, मुंबई येथे काम करत होता, त्याच्याकडे पाठवत असे. तिथून हा पैसा विविध बँक खात्यात पाठवण्यात येत असे. विविध बँक खात्याचा वापर करत अवैध व्यवसायातील पैसा त्यांच्या साथीदारांमार्फत सलीम डोला आणि पुढे दाऊदपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यासाठी अनेक बोगस फर्म, उपकंपन्यांचे मोठे जाळे तयार करण्यात आले होते.

सलीम डोला हाच मास्टरमाईंड

दाऊदचा जवळचा सलीम डोला हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आहे. देशातील अनेक ठिकाणी पकडलेल्या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे थेट डोलाशी जोडले जातात. सलीम डोलाच्या मुलाला गेल्यावर्षी दुबईतून हद्दपार करण्यात आले होते. सलीमचा मुल गा ताहिर हा सुद्धा ड्रग्स तसेच इतर अवैध धंदात सक्रिय होता. त्यातच या रॅकेटचा एक मुख्य सूत्रधार फैसल शेख, त्याची पत्नी अल्फिया शेख आणि इतर आठ जणांविरोधात ईडीने आता दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Follow Us
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?