AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसजीका एक ब्लू आईड बॉय है, वो उनको डुबानेवाला है, राऊतांनी विसरलेलं नाव आठवणीनं सांगितलं

संजय राऊत यांनी फडणवीसांचं थेट नाव घेत तब्बल 25000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित यांच्यावरुनही राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.

फडणवीसजीका एक ब्लू आईड बॉय है, वो उनको डुबानेवाला है, राऊतांनी विसरलेलं नाव आठवणीनं सांगितलं
Sanjay Raut
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 5:34 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनातून भाजपविरोधात एल्गार पुकारला आहे. राऊत यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पत्रकार परिषदेला सुरुवात केली. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद पाहत आहेत. मी इथूनच त्यांना नमस्कार करतो. नुकताच त्यांचा फोन येऊन गेला, शरद पवार यांचाही काही वेळापूर्वी फोन आला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन मला येऊन गेले. त्या सगळ्यांनी या पत्रकार परिषदेसाठी, मला आशीर्वाद दिले आहेत, असं राऊत म्हणाले.

या पत्रकार परिषदेद्वारे संजय राऊत यांनी राज्यातला विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या राज्यातील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांनी सर्वात आधी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. त्यानंतर राऊतांनी आपला मोर्चा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे वळवला. राऊत यांनी फडणवीसांचं थेट नाव घेत तब्बल 25000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित यांच्यावरुनही राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला.

राऊत म्हणाले, “मोहित कंबोज हा फडणवीसांचा हा फ्रंटमॅन आहे. तो ब्लू आईड बॉय आहे. तो फडणवीसांना एक दिवस बुडवणार आहे. पत्राचाळीचा जो मुद्दा आहे, ती जमीन खरेदी करणारा कंबोजच आहे. पीएमसीचे पैसे तिथंच गुंतलेत. तिथं मोहितचाच प्रोजेक्ट सुरु आहे. राकेश वाधवानचं मी नाव घेतलं. त्याच्याकडून 40 एकरमधले 12 हजार कोटींची जागा मोहितनं अवघ्या 100 कोटीत घेतली आहे. हा कंबोज बायो फार्मिग प्रायव्हेट लिमिटेड, केबीजी हॉटेल, काळभैरव अशा अनेक कंपन्या चालवतो. यात पैसा कुठून आला, फडणवीस साहेब तुम्हालाच माहीत आहे.”

कंबोजविरोधात तक्रार करण्यापेक्षा यांना गवगवाच करायचाय : दरेकर

दरम्यान, याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले, मोहित कंबोजच्या विरोधात आरोप करण्यापेक्षा तक्रार करण्यापेक्षा चौकशी करण्यापेक्षा त्यांना फक्त गवगवा करायचा आहे. पण ट्रेलरच फ्लॉप गेलाय. मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला, पण फार गर्दी दिसली नाही मला वाईट वाटलं की ज्या पद्धतीनं आमदार मोठ्या संख्येनं यायला हवे होते. परंतु शिवसेना नेत्यांनी याकडे पाठ फिरवली. आमदारांनी पाठ फिरवली. राऊत तोंडावर आपटले असंच दिसलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत भरकटत जाणं शिवसैनिकाला पटलेलं दिसत नाही.

इतर बातम्या

Sanjay Raut: किरीट आणि निल सोमय्यांना अटक करा, राऊतांची मागणी, नेमके आरोप काय?

Sanjay Raut: तो मुलूंडचा दलाल, भडवा, नाव न घेता संजय राऊतांनी सोमय्यांची अक्षरश: पिसं काढली

Sanjay Raut Press Conference : भाजप-ईडीवर तुटून पडण्यापूर्वी राऊतांना कुणा कुणाचा फोन? राऊतांनी ‘बाप’ काढत नावं सांगितली

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.