Sanjay Raut Press Conference LIVE : संजय राऊतांच्या वादळी पत्रकार परिषदेनंतर राजकारणात ठिणग्या, भाजपचा पलटवार

| Updated on: Feb 15, 2022 | 9:19 PM

Sanjay Raut Press Conference LIVE : शिवसेनेच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

Sanjay Raut Press Conference LIVE : संजय राऊतांच्या वादळी पत्रकार परिषदेनंतर राजकारणात ठिणग्या, भाजपचा पलटवार
राऊतांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं

शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना भवनात (Shiv sena Bhavan, Dadar) आज (मंगळवार 15 फेब्रुवारी, 2022) पत्रकार परिषद घेणार आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष शिवसेनेच्या आजच्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेकडे (Press conference of Sanjay Raut) लागलं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत हे महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट करण्याची शक्यताय. मोठ्या संख्येनं शिवसेनेचे कार्यकर्ते हे शिवसेना भवनाच्या दिशेनं निघालेत. दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पुढची पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता शिवसेनेच्या आजच्या पत्रकार परिषदेतून काय खळबळजनक खुलासे केले जातात, याकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची नजर लागली आहे. भाजपचे (Bhartiya Janata Party) साडे तीन लोक तुरुंगात जातील असा आरोप संजय राऊतांनी केला होता.आता ते साडेतीन लोक कोण आहे, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचंही राऊतांनी म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेसह राजकीय घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार असून, जाणून घेऊयात यांच संदर्भातले ताजे आणि वेगवान अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Feb 2022 09:16 PM (IST)

    नारायण राणे उद्या काय बोलणार?

    केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची उद्या बुधवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सांध्यकाळी 4.00 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

  • 15 Feb 2022 08:24 PM (IST)

    चंद्रकांत पाटलांनी राऊतांची खिल्ली उडवली

  • 15 Feb 2022 06:42 PM (IST)

    भाजप नेते मोहीत कंबोज Live

    आम्हीही झुकणार नाही

    संजय राऊतांना कंबोज यांचे खुले आव्हान

    संजय राऊतांचे स्मग्लरशी संबंध काय? हे मी येणाऱ्या काळात सांगेल

    मी त्यांचे कॉल रेकॉर्डींग देणार आगामी काळात

    संजय राऊत माझ्या घरी आलेले फोटो बघा

    मोहीत कंबोज यांनी फोटो दाखवले

  • 15 Feb 2022 06:38 PM (IST)

    भाजप नेते मोहीत कंबोज Live

    आज मुंबईत एवढी मोठी कारवाई झाली, त्यावर तुम्ही का गप्प बसले?

    ही जुगलबंदी जोडी कोण आहे, त्यांच्याशी तुमचा संबंध काय आहे?

    संजय राऊतांची आरोप खोटे, नवाब मलिकांसारखे हे उघडे पडले आहेत

    पाटकरबरोबर संजय राऊतांचा संबंध यावरही उत्तर द्या

    संजय राऊत आज लोकांसमोर एक्स्पोज झाले आहेत

    मी संजय राऊत यांना लीगल नोटीस पाठवणार

    ही सलीम जावेदची जोडी देशात एक्स्पोज झाली आहे

    कंगनाचे घर तोडण्याचे काम तुम्ही केले

    नारायण राणेंवर खोटी केस तुम्ही केली

    नितेश राणेंवर इगोसाठी केस केली

    रवी राणा यांच्यावरही खोटे आरोप तुम्ही केले

  • 15 Feb 2022 06:36 PM (IST)

    भाजप नेते मोहीत कंबोज Live

    प्रवीण राऊतांनी सत्तेचा दुरूपयोग करून 175 एकर जमीन एका बिल्डरला विकली

    हा पाच हजार कोटींचा प्रोजेक्ट आहे

    यात प्रवीण राऊत यांना साडेसातशे कोटी मिळाले

    त्यात संजय राऊतांना किती कट मिळाला?

    संजय राऊत आणि ग्रॅन्ड हयात हॉटेलचा काय संबंध आहे?

    संजय राऊत यांचा स्मग्लर लोकांशी काय संबंध आहे?

    यात संजय राऊतांना किती कोटी मिळतात?

    मोहीत कंबोज यांच्याकडून सवालांची सरबत्ती

  • 15 Feb 2022 06:34 PM (IST)

    भाजप नेते मोहीत कंबोज Live

    प्रवीण राऊतांबरोबर मिळून संजय राऊतांनी स्कॅम केला

    माझेच त्या स्कॅमध्ये नुकसान झाले आहे

    फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन खोटे आरोप करू नका

    माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, पूर्ण प्रकरणाची चौकशी करा

  • 15 Feb 2022 06:32 PM (IST)

    भाजप नेते मोहीत कंबोज Live

    जमीन स्वस्त घेतली सांगता

    एवढी जमीन तर आहे का? मुंबईत

    बारामतीची वनस्पती खाऊन बोलत होता का?

    मी राकेश वाधवान याच्यावर केलेला एफआयआर आहे

  • 15 Feb 2022 06:30 PM (IST)

    भाजप नेते मोहीत कंबोज Live

    मी फडणवीसांशी प्रामाणिक आहे

    पण तुम्ही पवारांशी प्रमाणिक आहे की उद्धव ठाकरेंशी?

    आज तुमच्याबरोबर एकही सत्तेतला माणून नव्हता

    आजचा तुमचा शो फ्लॉप होता

    तुम्ही आरोप केले तर तुम्हाला आधी अभ्यासाची गरज

  • 15 Feb 2022 06:29 PM (IST)

    भाजप नेते मोहीत कंबोज Live

    2017 ला दरवर्षी संजय राऊत माझ्या घरी आले

    दरवर्षी ते माझ्या घरी गणपतीला येतात

    मग ओळखत नाही, तर गजनी झाले का?

    राऊतांनी अनेकदा माझ्याकडून पैसे घेतले

  • 15 Feb 2022 06:27 PM (IST)

    भाजप नेते मोहीत कंबोज Live

    सलीम जावेदमधील जोडीतल्या जावेदने प्रेस कॉन्फरन्स घेतली

    राऊत मोठ्या नेत्यांबाबत बोलतात

    माझ्यासारख्या सदोतीस वर्षाच्या मुलाशी सरकार लढत आहे

    मला अनेक खोट्या केसमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला

    खोट्या स्टोरी घेऊन बाजारात येतात

  • 15 Feb 2022 06:20 PM (IST)

    फडणवीसांनी राऊतांच्या आरोपांची धास्ती घेतली?

    फडणवीस दिल्लील जाण्याची शक्यता

    चंद्रकांत पाटील आधीच गेलेत

  • 15 Feb 2022 05:51 PM (IST)

    नितेश राणेंची राऊतांवर घणाघाती टीका

  • 15 Feb 2022 05:49 PM (IST)

    राऊतांना प्रत्युत्तर देण्यासाठी मोहीत कंबोज मैदानात

  • 15 Feb 2022 05:12 PM (IST)

    कुणाची नावं घ्यायची त्याची घ्या-राऊत

    एकादा माणूस अडचणीत आल्यास त्याचा थयथयाट होतो

    तुमच्या मुलीच्या लग्नाची चौकशी होते, तर कायतर दोष असेल

    काही दोष नसेल तर न्यायलय ईडीला विचारणा करेल

    गेले दोन दिवस दवंडी पिटत होते

    राऊतांच्या गळ्याशी आरोप आल्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न

    मुख्यमंत्र्यांना वाकवून यंत्रणा राऊतांनी राबवली

  • 15 Feb 2022 05:10 PM (IST)

    चंद्रकांत पाटलांनी राऊतांची खिल्ली उडवली

    खोदा पाहड आणि निकला चुहा

    आशा आरोपांनी काय होत नाही

    पुरावे आहेत, तर एजन्सीकडे जा

    त्यांनी नाही ऐकलं तर कोर्टाकडे जा

    आम्ही कोर्टाच्या निर्णयांमुळेच टीकलो आहोत

  • 15 Feb 2022 05:04 PM (IST)

    संजय राऊतांना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

    मी चाणाक्य आहे असा अभास संजय राऊतांना झाला आहे

    राऊतांच्या ईडी मागे लागली हे मला माहीत नाही

    राज्य सरकारने माझ्या मुलीच्या लग्नातील खर्चाची चौकशी केली आहे

    आपल्यावर आरोप झाले म्हणून माझ्यावर आरोप करू नये

    संजय राऊत नऊ कोटींचं नाही तर नऊ लाखांचं कार्पेट म्हणाले

    शिवसेनेचे कॅबिनेटमध्ये मंत्री होते

    त्यांना त्यावेळी कळलं नाही का? शिवसेनेचे मंत्री जागरूक होते

  • 15 Feb 2022 04:59 PM (IST)

    शिवसेनेचे आमदार का आले नव्हते?-दरेकर

    राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार-दरेकर

  • 15 Feb 2022 04:57 PM (IST)

    खोदा पहाड, निकला चूहे का फोटो-मुनगंटीवार

    संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत काहीही निघालं नाही,

    संजय राऊतांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल-फडणवीस

  • 15 Feb 2022 04:56 PM (IST)

    संजय राऊत तोंडवर आपटले-दरेकर

    छातूरमातूर गोष्टी करून काय होणार नाही-दरेकर

    पुरावे द्या आणि सोमय्यांना जेलमध्ये टाका

    राऊतांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही

    सत्तेतल्या पक्षाने मागणी करायची नसते

    एकतर सरकार तुमचं ऐकत नाही

  • 15 Feb 2022 04:54 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    उद्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळेल

    जसजसे आत घुसू तसतसे भाजपला कळत जाईल

  • 15 Feb 2022 04:51 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    देवेंद्र फडणवीसांचा आणकी एक फ्रंट मॅन आहे मोहीत कंबोज नावाच

    फडणवीस तुम्हाला बुडवणार आहे

    पत्राचाळमध्ये मोहीत कंबोज याचा प्रोजेक्ट सुरू आहे

    आणि आमच्यावर भष्टाचाराचे आरोप करतोय

    या प्रोजेक्टमध्ये पीएमसी घोटाळ्याचे पैसे लागले आहेत

    फडणवीसांचा ब्लू एन्ड बॉय आहे, याकडे एवढा पैसा कठून आला, हे फक्त फडणवीसांनाच माहीत आहे

  • 15 Feb 2022 04:50 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    कितीही धमकावा महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार

    2024 मध्ये परिवर्तन होणार

    हा फक्त ट्रेलर आहे

    येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रं, आणखी व्हिडिओ समोर येणार

    दिल्लीत जावा नायतर कुठेही जावा तुम्ही वाचणार नाही

    राऊतांनी भाजपला ठणकावलं

  • 15 Feb 2022 04:48 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    अमित शाह, मोदींना माझा सवाल आहे, हीच तुमची लोकशाही आहे का?

    माझ्या जवळच्या लोकांवर रेड सुरू झाल्यावर मी अमित शाह यांना फोन केला

    त्यांना सांगितलं माझ्याशी दुष्मनी असेल तर मला पकडा

    माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ नका

  • 15 Feb 2022 04:47 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न

    पण मला जेलमध्ये टाकण्यासारखी जेल अजून बनली नाही

    अलिबागमदून 80 वर्षाच्या वृद्धाला उचलून नेलं

    ईडीच्या अधिकाऱ्यांनी इथेच तू मरणार म्हणून धमकावलं

  • 15 Feb 2022 04:46 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    ईडीची लोकं कुठं बसतात, कुठं खातात, कुठं पितात, सगळं तुम्हाला सांगू शकतो,

    सगळ्यांची माहिती आहे..

  • 15 Feb 2022 04:46 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, पीएमसची तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीत पाठवलेत.. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता... सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो.. ईडी भ्रष्ट आहे, हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावाय

  • 15 Feb 2022 04:40 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    ईडी आणि सीबीआय, ईओडब्लू, पंतप्रधान, गृहमंत्री मला ऐकत आहेत

    मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी किसकी है?

    किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत

    किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे

    पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि जमीन घेतली दुसऱ्याच्या नावावर

    वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली

  • 15 Feb 2022 04:37 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    मी पळपुटा नाही, मी माझ्या मित्रांना टाळणार नाही

    माझ्या मित्रांना मुद्दाम फ्रेम केले

    पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख

    राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले

    राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर

  • 15 Feb 2022 04:35 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    भाजपच्या काळात पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाला

    कोण आहे अमोल काळे ?

    पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्या हातात आहे

    ते ईडीला देणार

    आमची गुंठ्यातली जमीन मोजली, आमचे नसणारे बंगले दाखवले

    आता भाजपला मीही दाखवतो

    ईडीने चुकीच्या माणसांशी पंगा घेतला आहे

    ईडीने शिवसेना आणि महाराष्ट्राशी पंगा घेतला आहे

  • 15 Feb 2022 04:32 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    ईडीची टक्कर शिवसेनेशी आहे

    हरयाणातला दूधवाला नरवरला ईडी ओळखते का?

    नरवर 7 हजार कोटींचा मालक कसा झाला?

    महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीसांच्या घरात त्याचं येणं जाणं होतं

    भाजपच्या मनी लॉन्ड्रीगच्या केसेस लवकरच देणार

    साडेतीन हजार कोटी महाराष्ट्रातून गेले

    भाजपच्या काळातल्या भ्रष्टाचारातून गेले

  • 15 Feb 2022 04:30 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    भाजपच्या वनमंत्र्यांच्या मुलीचे लग्न ईडीला दिसले नाही का?

    माझं खुलं आव्हान आहे ईडीला, तुम्ही मला जेलमध्ये टाकून दाखवा

    मात्र माझ्याबरोबर भाजपवालेही जेलमध्ये असतील

    मी जिथे कपडे शिवून घेतले तिशेही ईडीवाले गेले

    आता फक्त बुटवाल्याकडे जाण्याचे बाकी आहेत

  • 15 Feb 2022 04:29 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    लोकांना तिहारच्या जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या

    माझ्या मुलीच्या लग्नाच्या हिशोबाला लागले आहेत

    फुलवाले, पताकावाले, मेहंदीवेल्याडे पण ईडीवाले गेले

  • 15 Feb 2022 04:27 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    मी कधीही चुकीचे काम केलं नाही

    ईडीच्या लोकांनी सकाळी माझ्या बँकेची स्टेटमेंट नेली

    ईडीच्या लोकांनी माझ्या 50 गुंठे जमिनीची चौकशी केली

    पाहटे चार वाजता ईडीने घरातून लोक उचलले

    माझ्या विरोधात खोट्या साक्ष लिहून देण्यास जबरदस्ती केली

    त्यांना अनेक तास डांबून ठेवलं

  • 15 Feb 2022 04:26 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे घेतली हे दाखवावं

    बाराव्या माणसाकडून पाटणकरांनी जमीन घेतली

    राऊतांनी पूर्ण यादी वाचली

    पाटणकर आणि देवस्थानाचा काही संबंध नाही

    आम्ही देवस्थानाकडून जमीनी खरेदी केल्या नाहीत

  • 15 Feb 2022 04:24 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    मराठी माणसाविषयी भाजपला द्वेष

    किरीट सोमय्यांनी काही वर्षापूर्वी मराठी भाषा सक्तीची नसावी असं अपील केलं होतं

    आणि मुंबईत भाजप मराठी कट्टा चालवते

    हाच तो, भडवा, दलाल, कोर्टात जातो आधी याचं थोबाड बंद करा

  • 15 Feb 2022 04:23 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    किरीट सोमय्यांचा भडवा, दलाल म्हणून उल्लेख

    माझं आव्हान आहे त्या दलालाला, आपण चार बसेस करून पिकनीकला जाऊ

    जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन

    आणि जर बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारू

    कुठे आहेत एकोणवीस बंगले?

  • 15 Feb 2022 04:21 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेणार होतो

    मात्र सुरूवात इथे शेवट ईडीच्या कार्यालयापुढे करू

    इतके घाणेरडे राजकारण कधी झालं नाही

    महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे

    आम्ही मागे हटणार नाही

  • 15 Feb 2022 04:19 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    वडिलांना अटक करू अशा मुलांना धमक्या दिल्या गेल्या

    असे राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नाही

    गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ले झाले

    मुख्यमंत्र्यांनी मला लोकांसमोर सत्य मांडण्यास सांगितलं

  • 15 Feb 2022 04:19 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल

    केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्रास दिल्यास आम्ही झुकणार नाही

    आम्हाला बाळासाहेबांनी झुकायला शिकवलं नाही

    काहीही करा हे सरकार पडणार नाही

    हे सांगितल्यापासून माझ्या आजुबाजुच्या लोकांना अडकवण्याचा प्रयत्न झाला

    माझ्यावरील सर्व आरोप खोटे,

    मराठी माणसाने धंदा करू नये असे यांना वाटते

  • 15 Feb 2022 04:18 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    मी नकार दिल्यानंतर पवारांवरील धाडीबाबत सांगितलं

    त्यानंतर पवारांच्या कुटुंबियांवर धाडी पडू लागल्या

    ईडीचे लोक तिथे ठाण मांडून बसले

    याच धमक्या त्यांनाही दिल्या

    केंद्रीय पोलीस आणून थंड पाडण्याची धमकी

    हे बोलल्यानंतर माझ्यावर आणि माझ्या लोकांवर तीन दिवसांत धाडी सुरू

  • 15 Feb 2022 04:16 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रमुख लोक मला भेटले

    त्यांनी मला सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडण्यास सांगितले

    आमची संपूर्ण तयारी झाली आहे

    राष्ट्रपती राजवट आणू, अन्यथा आमदार फोड, पण सरकार आणू

    असे भाजप नेते म्हणाले

    तुम्ही आम्हाला मदत केली नाही, तर तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील, फिक्स करतील

    याची सर्व सेटिंग दिल्लीत झाली आहे, तुम्हाला नंतर पश्चाताप होईल, अशा धमकी दिल्या

  • 15 Feb 2022 04:14 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे

    सरेंडर व्हा अन्यथा, सरकार पाडू अशा धमक्या भाजप देत आहे

    एकशे सत्तरचे बहुमत असताना भाजप कुणाच्या भरोशावर तारखा देत आहे?

    उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे, ते सर्व त्या पत्रात आहे

    माझ्यासारख्या लोकांना त्रास दिला जातोय

  • 15 Feb 2022 04:11 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    महाराष्ट्र गांडूची औलाद नाही

    आम्ही घाबरणार नाही

    कितीही वार केले तरी आम्ही थांबणार नाही

    अनेक आमच्या नेत्यांना त्रास दिला गेला

    राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना त्रास दिला गेला

    केंद्रीय तपास यंत्रणेचे आमच्यावर हल्ले

    हे देशावरचे संकट आहे

    असेच सरकार पश्चिम बंगालमध्येही आलं आहे

  • 15 Feb 2022 04:11 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    बाळासाहेब सांगायचे कुणाच्या बापाला घाबरू नका

    गुन्हा केला नसेल तर निडर रहा

    मुख्यमंत्री हीच सेना पुढे नेत आहेत

  • 15 Feb 2022 04:10 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    संपूर्ण शिवसेना इकडे उपस्थित आहे

    राऊतांनी जुन्या सहकाऱ्यांची नावं घेतली

    मुख्यमंत्र्यांना माझा शिवसेना भवनातून नमस्कार

    आता मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन आलेला

    मुख्यमंत्री वर्षावरून पत्रकार परिषद पाहत आहे

    सर्वांनी मला आशिर्वाद दिले

    महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमक सुरू आहे

    त्याविरोधत कोणीतरी रणशिंग फुंकायला हवे होते

    ते आम्ही इथून फुंकत आहोत

  • 15 Feb 2022 04:07 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    जय महाराष्ट्र, करून पत्रकार परिषदेला सुरूवात

    मला वाटतं ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे-राऊत

    बाळासाहेब ठाकरे यांना राऊतांचं अभिवादन

    या वास्तूला एक महत्व आहे

    अनेक लढे आम्ही याच वास्तू मधून लढलो

    अनेक हल्ले पचवले

    नुसते हल्ले नाही, अतिरेकी हल्ले पचवले

    या वास्तूखाली बॉम्बस्फोट झाले

  • 15 Feb 2022 04:05 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    संजय राऊत पत्रकार परिषदेत बसले

    आता कुणाची पोलखोल होणार?

    बोलण्याआधी राऊतांनी फाईली कुठे आहेत विचारलं?

    राऊतांचा सहकाऱ्यांना सवाल

    राऊतांनी सर्व फाईली मागवून घेतल्या

    राऊतांच्या फाईलींमध्ये कोणते मोठे गुपीत?

  • 15 Feb 2022 04:03 PM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

    पत्रकार परिषदेआधी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण

    आनंदराव अडसूळ, दिवाकर रावतेही पुष्पहार अर्पण करण्यास उपस्थित

  • 15 Feb 2022 04:02 PM (IST)

    संजय राऊत पत्रकार परिषदेत दाखल

    शिवसेनेचे नेते संजय राऊतांच्या सोबत

    मुंबईच्या महापौरही राऊतांच्या सोबत

    खासदार विनायक राऊत पत्रकार परिषदेत संजय राऊतांसोबत

  • 15 Feb 2022 03:59 PM (IST)

    पत्रकार परिषदेला कोणते नेते उपस्थित?

    खासदार अरविंद सावंत

    खासदार विनायक राऊत

    कामगार नेते, शिवसेना उपनेते सचिन अहिर

    खासदार अनिल देसाई

    आमदार मनीषा कायंदे

    ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के

    आमदार रवींद्र फाटक

    आमदार सदा सरवणकर

    मंत्री उदय सामंत

    शिवसेनेचे बरेचसे आमदार उपस्थित

    संजय राऊत एकटे पडले म्हणून भाजपचे नेते सांगत होते

    मात्र संजय राऊत एकटे नाहीत हे भाजपला दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नेते, आमदार, खासदार, मंत्री उपस्थित

  • 15 Feb 2022 03:50 PM (IST)

    आम्ही केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शांत-शिवसैनिक

    भाजप चिरीमिरी आहे,

    कुठे फाडून फेकून देऊ कळणार नाही,

    मुंबईत शिवसैनिकांचा एल्गार

    बाप हा बाप असतो, भाजपच्या डिवचण्याचा फरक नाही पडत

  • 15 Feb 2022 03:47 PM (IST)

    राऊत सेना भवनात दाखल होताच एकच जल्लोष

    शिवसेना खासदार संंजय राऊतांचं कार्यकर्त्यांना हात उंचावून प्रतिसाद, सेना भवनात राऊत दाखल होताच एकच जल्लोष

  • 15 Feb 2022 03:46 PM (IST)

    उरली अवघी काही मिनिटं

    काही मिनिटात संजय राऊतांची पत्रकार परिषद

    संजय राऊत शिवसेना भवनात दाखल

    शिवसैनिकांची मोठी घोषणाबाजी

    मुंबई जिंकणे हे भाजपचे केवळ स्वप्न-कार्यकर्ते

  • 15 Feb 2022 03:40 PM (IST)

    संजय राऊतांनी हात वर करून अभिवानदन केलं

    सेनाभवनात शिवसैनिकांची मोठी गर्दी

    संजय राऊतांना सेनाभवनात नेताना मोठी गर्दी

    संजय राऊत शिवसेना भवनाच्या आत दाखल

  • 15 Feb 2022 03:36 PM (IST)

    शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

    संजय राऊत दाखल झाल्यावर शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह

    शिवसैनिकांची भाजवविरोधात जोरदार घोषणाबाजी

    गर्दीतून मार्ग काढत शिवसैनिकांची गाडी पुढे

    बर्दाश किया अब बर्बाद करेंगे नारा खरा ठरणार?

  • 15 Feb 2022 03:34 PM (IST)

    संजय राऊत सेनाभवनात दाखल

    संजय राऊत शिवसेना भवनात दाखल

    कोणत्या घोटाळ्याचा गौप्यस्फोट?

    संजय राऊतांना सुरक्षा रक्षकांचा गराडा

    सेनाभवनात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली

  • 15 Feb 2022 03:33 PM (IST)

    संजय राऊत खुद्द बोलतील तेव्हा सर्व स्पष्ट होईल-बांदेकर

    काही मिनिटात राऊतांची पत्रकार परिषद

    संजय राऊत काय बॉम्ब फोडणार

    भाजप नेत्यांची ऐनवेळी दिल्ली वारी

    भाजप नेत्यांबाबत बोलणं राऊतांनी टाळलं

  • 15 Feb 2022 03:33 PM (IST)

    मोठ्या संख्येनं शिवसैनिक दाखल सेनाभवनात दाखल

    मोठ्या संख्येनं शिवसैनिक सेना भवनात दाखल झाले आहेत. बहुप्रतीक्षित पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातले शिवसैनिक सेना भवन परिसरात दाखल झाले आहेत.

  • 15 Feb 2022 03:30 PM (IST)

    आदेश बांदेकरसह अनेक सेना नेते सेनाभवनात दाखल

    आदेश बांदेकरसह अनेक नेते सेना भवनात दाखल, संजय राऊतही सामना कार्यालयातून सेना भवनाच्या दिशेनं निघाले

  • 15 Feb 2022 03:25 PM (IST)

    संजय राऊत शिवसेना भवनाकडे रवाना

    संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी रवाना

    संजय राऊत सामनाच्या कार्यालयातून निघाले

    काही मिनिटात राऊतांची पत्रकार परिषद

  • 15 Feb 2022 03:16 PM (IST)

    मनसेचा ट्विट करून शिनसेनेला टोला

  • 15 Feb 2022 03:01 PM (IST)

    आत्ताची सर्वात मोठी अपडेट

    भाजप नेत्यांची दिल्ली वारी

    किरीट सोमय्याही दिल्लीला रवाना

    भाजप नेत्यांच्या अचानक दिल्ली वारीने चर्चांना उधाण

    संजय राऊतांकडे कुणाची फाईल? कुणाचा व्हिडिओ

  • 15 Feb 2022 02:51 PM (IST)

    शिवसेनेची नेतेमंंडळी जमण्यास सुरूवात

    संजय राऊत यांचे पक्षातील निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी आणि बाळा कदम सामनात दाखल

  • 15 Feb 2022 02:32 PM (IST)

    'चोर की दाढी में चुगार' नवनीत राणांचा राऊतांवर टीका

    संजय राऊत दरोरोज नऊ वाजता पत्रकार परिषद घेतात त्यात काही नवीन नाही. रोज पोपट येऊन बोलतात. त्यांना सवय झाली आहे. त्यात काहीच नसते. चोर की दाढी मे चुगार, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यांना ईडी ची भीती वाटत आहे. तुमचे काळे धंदे असेल तर ते ही बंद होईल,संविधान ला मागे ठेऊन हे सरकार काम करत आहे अशी टीका खासदार नवनीत राणा यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली आहे.
  • 15 Feb 2022 02:06 PM (IST)

    किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करणारे शिवसैनिक मुंबईकडे रवाना

    शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला पुण्याहून शिवसैनिक मुंबईकडे निघालेत,

    - शिवाजीनगरहून मुंबईकडे रवाना,

    - शिवसेना शहरप्रमुखांसह नगरसेवक आणि शिवसैनिकांचा समावेश,

    - किरीट सोमय्यांना धक्काबुक्की प्रकरणातील शिवसैनिक मुंबईकडे रवाना,

  • 15 Feb 2022 01:56 PM (IST)

    खा. नवनीत राणा यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका

    संजय राऊत दरोरोज नऊ वाजता पत्रकार परिषद घेतात त्यात काही नवीन नाही..

    रोज पोपट येऊन बोलतात.त्यांना सवय झाली आहे. त्यात काहीच नसते.

    चोर की दाढि मे चूगार अशी त्यांची परिस्थिती आहे.त्यांना ईडी ची भीती वाटत आहे...

    तुमचे काळे धंदे असेल तर ते ही बंद होईल,संविधान ला मागे ठेऊन हे सरकार काम करत आहे..

    खा. नवनीत राणा यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका...

  • 15 Feb 2022 01:37 PM (IST)

    शिवसेना भवनाजवळ वाहतूक मंदावली, पर्यायी मार्ग वापरा! पोलिसांचं आवाहन

    चार वाजता संजय़ राऊत यांची पत्रकार परिषद, शिवसेना भवनाच्या जवळ झाले वाहतुकीची कोंडी
    मुंबई पोलिसांनी मार्ग बदलण्याबाबत केले होते ट्विट, ट्राफिक होऊ नये म्हणून केले होते ट्विट

  • 15 Feb 2022 01:31 PM (IST)

    जयप्रभा स्टुडिओ सिनेसृष्टीसाठी वापरता यावा हे कोल्हापूरकरांची पहिल्यापासूनच भावना

    जयप्रभा स्टुडिओ सिनेसृष्टीसाठी वापरता यावा हे कोल्हापूरकरांची पहिल्यापासूनच भावना

    लतादीदींच्या स्मृती जपण्यासाठी जयप्रभा स्टुडिओत स्मारक करण्यासंदर्भात अनेकांनी भूमिका

    मात्र आता याची विक्री झाल्याचे समोर आले

    आता या जागेबाबत शासन स्तरावर काय करता येईल याबाबत विचार करून

    जागेची किंमत ठरवून जयप्रभा स्टुडिओ जागा घेता येईल का यासाठी प्रयत्न करू

    चित्रनगरीला जयप्रभा स्टुडिओ जोडता येईल का या ही दृष्टीने ही प्रयत्न करणार

    मूळ मालक मंगेशकर कुटुंबीय आहेत आता विक्री झाली आहे त्यामुळे या वादात पाडण्यात अर्थ नाही

    मंगेशकर कुटुंबाने ही स्मारका बाबत वाद करू नये अशी भूमिका घेतली आहे

    आता मागे काय घडलं यापेक्षा पुढे चांगलं काय करत येईल हे पाहूया

    वादानंतर मूळ मालकांनी केलेल्या मागणीवर शासकीय स्तरावर चर्चा सुरू होईल त्यावेळी यावर बोलता येईल

    अमित देशमुख, एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊ

    मालकांकडून लेखी मागणी आल्या शिवाय निर्णय घेता येणार नाही

    जयप्रभा संदर्भात लता दीदी हयात असतांना त्यांची भेट मागितली होती मात्र कोरोनामुळे त्या कोणाला भेटत नव्हत्या

  • 15 Feb 2022 01:13 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगरपंचायती काँग्रेसची एक हाती सत्ता

    शांततेत पार पडली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया

    कोरची नगरअध्यक्ष हर्षलता भैसारे काँग्रेस,

    उपाध्यक्ष - हिरा राऊत काँग्रेस

    कोरची नगरपंचायत मागील पाच वर्ष शिवसेना अडीच वर्ष भाजप अडीच वर्षे सत्तेत होते

    पण आता काँग्रेसने एकहाती सत्ता या ठिकाणी हासिल केलेली आहे

  • 15 Feb 2022 01:08 PM (IST)

    'झुकेंगे नहीं!' शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

    वाघाच्या फोटोवर झुकेंगे नहीं, असं म्हणत शिवसेनेची सेना भवनाबाहेर पोस्टरबाजी

  • 15 Feb 2022 01:03 PM (IST)

    तब्बल 4 तास छापेमारी! हसीना पारकरच्या घरातून ED अधिकारी अखेर निघाले

    हसीना पारकरच्या घरी चालली तब्बल 4 तास ईडीची छापेमारी, चार तासांच्या छापेमारीनं ईडीचे अधिकारी हसीना पारकरच्या घरातून निघाले

  • 15 Feb 2022 12:54 PM (IST)

    कोल्हापूरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

    कोल्हापूरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

    दसरा चौक ते जिल्हाधिकारी असा निघणार मोर्चा,

    केंद्र सरकारने खत़ाची दरवाढ कमी करावी ,पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती कमी करा,

    वीज कनेक्शन कापू नका या मागणीसाठी आज काढणार मोर्चा,

    राजू शेट्टी करणार मोर्चाचं नेतृत्व,

  • 15 Feb 2022 12:49 PM (IST)

    शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी सुरु

    शिवसेना भवनातून घेतलेला थेट आढावा, दुपारी चार वाजता सुरु होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी तयारीला वेग

    पाहा व्हिडीओ-

  • 15 Feb 2022 12:33 PM (IST)

    मोठी बातमी! छोटा शकीलचा नातेवाईक ईडीच्या ताब्यात

    छोटा शकीलचा नातेवाईक सलिम प्रुट ईडीच्या ताब्यात, गँगस्टर छोटा शकीलचा नातेवाईकला अखेर ताब्यात घेण्यात आलं, आता कसून चौकशी सुरु

  • 15 Feb 2022 12:22 PM (IST)

    शिवसेना भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त

    आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते आहे.

  • 15 Feb 2022 11:59 AM (IST)

    देवळा नगरपंचायत नगराध्यक्षपदी भारती आहेर

    -देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदी भाजपच्या भारती आहेर यांचा यांची वर्णी...

    -विरोधात एकही अर्ज नसल्याने फक्त घोषणेची औपचारिकता बाकी...

    -१७ पैकी १५ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारती आहेर यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल न केल्याने निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे...

    -भाजपचे नेते केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आल्याने केदा आहेर यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे..

  • 15 Feb 2022 11:47 AM (IST)

    नारायण राणेंच्या घरात सिधुदुर्गमधील घरासमोर आंदोलन

    सिधुदुर्गमधील नारायण राणेंच्या घरासमोर आंदोलन पोलिसांचा बंदोबस्त आंदोलनात नारायण राणेच्या विरोधात घोषणा

  • 15 Feb 2022 11:42 AM (IST)

    ईडी गुजरातमध्ये कधी जाणार? राऊतांचा सवाल!

    ईडी गुजरातमध्ये कधी जाणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. नेमकं संजय राऊत यांनी काय म्हटलंय, पाहा व्हिडीओ -

  • 15 Feb 2022 11:40 AM (IST)

    केंद्रानं 7 वर्षात काय केलं? सुप्रिया सुळे आक्रमक

    ICE चा गैरवापर सुरु आहे, विरोधी पक्षातच नोटीशी कशा येतात, याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, विरोधात असल्या की नोटीस येतात, भाजपमध्ये गेल्या की नोटीस कशा विरघळतात हा प्रश्नच आहे, लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय, असं सुप्रियाा सुळे यांनी म्हटलंय. तसंच गुजरात बँक घोटाळ्यावरुनही त्यांनी हल्लाबोल केलाय. या देशात कुठल्याही राज्यात घोटाळा असेल, तर त्यांची जबाबदारी केंद्राने घ्यावी, इतक्या वर्षाचा हिशोब नको का द्यायला? 7 वर्षाचा हिशोब सांगा, मग चेक्स आणि बँलन्से एकाच कंपनीत कशा राहून केल्या, त्याचं स्पष्टीकरण केंद्रानं द्यावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

  • 15 Feb 2022 11:32 AM (IST)

    चंद्रपुरात पहाटेच्या सुमारास वाघोबाचे दर्शन

    चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नागपूर मार्गावरील प्रवेशद्वारावर वाघाचा मुक्त संचार,

    या भागात कार्यरत कामगारांना झाले दर्शन, या प्रवेशद्वारातून थेट वसाहत आणि कोळसा हाताळणी यंत्राकडे जातो मार्ग,

    वीज केंद्राच्या परिसरात वाघासह अन्य वन्यजीव ठरत आहेत कामगारांसाठी धोकादायक,

    वनविभाग आणि वीज केंद्र व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या उपाययोजना करण्याची गरज

  • 15 Feb 2022 11:28 AM (IST)

    राऊत सामना कार्यलयात पोहोचले!

    शिवसेना खासदार संजय राऊत सामना कार्यलयात दाखल, आज संध्याकाळी काय बोलणार याकडे लक्ष

  • 15 Feb 2022 11:20 AM (IST)

    आज 4 वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद!

    शिवसेना भवनात दुपारी 4 वाजता पार पडणार पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष, संजय राऊत मोठे गौप्यस्फोट करण्याची दाट शक्यता

  • 15 Feb 2022 11:20 AM (IST)

    आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये किरीट सोमय्यांनी दाखल केला गुन्हा

    आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये 89 पानी पोलिस तक्रार 7 दिवसात गुन्हा दाखल करणार राऊतांच्या जवळच्या लोकांवर गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई का केली नाही. सुजीत पाटकरला अटक का केली नाही संजय राऊतांनी नौटकी बंद करावी. चहावाल्याची नीट चौकशी करा सुजीत पाठकरला अटक करा

  • 15 Feb 2022 11:17 AM (IST)

    मी जेलमध्ये जायला तयार, पण... - सोमय्या

    संजय राऊतांना मी मूर्ख वाटलो काय? आता मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण त्याआधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. सोमय्यांचा राऊतांना थेट चॅलेंज

  • 15 Feb 2022 11:16 AM (IST)

    आझाद नगर पोलिस स्थानकात सोमय्यांची तक्रार

    किरीट सोमय्या यांनी 89 पानांची तक्रार आझाद नगर पोलिस स्थानकात दिली आहे. राऊतांच्या निकटवर्कीय पाटकर यांनी कोविड पेशंटच्या जीवाशी खेळ केला, धंदा केला,कोट्यवधी रुपये लाटल्याचा पुन्हा एकदा आरोप सोमय्यांनी केलाय. सुजीत पाटकरला एकूण 13 कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. पाटकर विरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.  सात दिवसांत एफआयआर दाखल करा, नाहीतर आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये केस फाईल करणार, अशा इशारा त्यांना दिलाय. इटरनर हेल्थ केअरचं रजिस्ट्रेशन करताना बोगस कागदपत्र दिल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.

  • 15 Feb 2022 10:48 AM (IST)

    राऊतांकडून शिवसेना भवनाबाहेरुन फोटो ट्वीट!

    आजच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच संजय राऊत यांनी सकाळी सेना भवनाबाहेरुन फोटो ट्वीट करत आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे.

  • 15 Feb 2022 10:45 AM (IST)

    नाशकातून मुंबईच्या दिशेनं सेना कार्यकर्ते रवाना!

    शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले

    संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना

    जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित

    घोषणाबाजी देत शिवसेनेचे नेते निघाले

  • 15 Feb 2022 10:44 AM (IST)

    सौ सोनार की एक लोहार की, आजच्या पत्रकार परिषदेच्या आधी राऊतांची सूचक इशारा

    आजच्या पत्रकार परिषदेआधी काय म्हणाले संजय राऊत?

Published On - Feb 15,2022 10:32 AM

Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.