
मुंबई: आगामी निवडणूकीच्या तोंडावर आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget) आज सादर होणार आहे. कोरोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे ऑनलाईन बजेट सादर होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात 3 हजार कोटींपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन कोणतीही नवी करवाढ किंवा शुल्कवाढ टाळण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा (Shivsena) कल असेल. मतदारांना खूष करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचीही घोषणा होणार असल्याची माहिती आहे. खड्डे मुक्त रस्ते, सक्षम आरोग्य यंत्रणा, पूरमुक्त मुंबई, कुठलीही कर वाढ नसलेला यंदाचा अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी वाढ होऊन पालिकेचा अर्थसंकल्प 41 हजार कोटींचा मांडला जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
कोस्टल रोड प्रकल्पावर वाढीव तरतूद
12 हजार कोटी रुपयांची तरतूद याआधीच्या अर्थसंकल्प करण्यात आली आहे. मात्र पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित असल्याने अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
समुद्राचे पाणी गोडे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे.
कोरोना ससंर्ग आणि ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळं मुंबई महापालिका आरोग्यावर देखील तरतूद करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात दवाखान्यांच्या संख्येत वाढ, मोठ्या रुग्णालयांचा विस्तार करण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
बेस्ट उपक्रम तोट्यात असून बेस्ट ची गेल्या तीन वर्षांची तूट भरून काढण्यासाठी पालिकेने बेस्टला 6650.48 कोटी रुपये दिले. त्यामुळे बेस्टचा थोडासा भार हलका झाला आहे.तरीही बेस्टची अद्याप तीन हजार कोटींची तूट शिल्लक आहे. पालिकेने 2020-21 मध्ये बेस्ट साठी 1500 कोटींची तरतूद केली होती. यावर्षी बेस्टसाठी महापालिका काय तरतूद करते याकडे लक्ष लागलं आहे.
पालिकेचा 2020-2021 मध्ये बजेट मांडताना 33441.02 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी 2021-22 च्या बजेटमध्ये नव्या प्रकल्पांसह मोठ्या विकास योजनांसाठी तब्बल 16.74 टक्केची वाढ करून 39 हजार 38 कोटींचं मेगा बजेट सादर करण्यात आले होते. तर,यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी वाढ होऊन पालिकेचा अर्थसंकल्प 41 हजार कोटींचा मांडला जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या:
भाजपा कार्यकर्त्यांना डिवचल्यास “जशास तसे उत्तर देऊ”, काँग्रेसच्या मोर्चावरून पॉलिटिकल रणांगण
मुंबईतील निर्बंध आणखी शिथील, रात्रीची संचारबंदी हटवली, नवे नियम काय?
BMC Budget 2022 23 will be presented by commissioner Iqbal Chahal via online mode focus on infrastructure works