पालिकेचा धमाका, विनामास्क फिरणाऱ्या 8 लाख लोकांवर कारवाई, 17 कोटींचा दंड वसूल

BMC प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांकडून 16 कोटी 76 लाख 67 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केलाय. BMC collected fine of 17 Cr.

  • विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 10:41 AM, 25 Dec 2020
पालिकेचा धमाका, विनामास्क फिरणाऱ्या 8 लाख लोकांवर कारवाई, 17 कोटींचा दंड वसूल
मुंबई महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांकडून 17 कोटींचा दंड वसूल केलाय.

मुंबई: कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आता घेतला आहे. 20 एप्रिल ते 23 डिसेंबर या कालावधीत विना मास्क आढळलेल्या 8 लाख 20 हजार 167 नागरिकांवर कारवाई करुन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुमारे 16 कोटी 76 लाख 67 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.(BMC collected fine of 17 cr. from citizens not wearing mask)

विना मास्क नागरिकांवर कारवाई:

मुंबई महानगरपालिकेने कोविड-19 अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च 2020 पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत 8 लाख 20 हजार 167 नागरिकांवर कारवाई करून सुमारे 16 कोटी 76 लाख 67 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाई नंतर मास्क मोफत:

मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जात आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जात आहे.(BMC collected fine of 17 cr. from citizens not wearing mask)

कारवाईसाठी पथक:

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 14 ऑक्टोबर 2020 रोजी बैठक घेऊन विना मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार केली आहेत. या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. विना मास्क नागरिकांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच क्लीन-अप मार्शल ही नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कार्यवाही अत्यंत महत्वाची ठरते आहे.

कोणत्या विभागात किती कारवाई:
झोन           व्यक्ती        दंड रुपये
झोन 1 – 1,16,765 – 2,39,23,500
झोन 2 – 1,50,572 – 3,04,45,700
झोन 3 – 1,06,737 – 2,26,32,400
झोन 4 – 1,26,334 – 2,58,16,200
झोन 5 – 93,918 – 1,90,00,300
झोन 6 – 1,11,538 – 2,23,51,000
झोन 7 – 1,14,312 – 2,34,98,500
एकूण – 8,20,167 – 16,76,67,600

संबंधित बातम्या:

ब्रिटनहून दीड हजार प्रवासी मुंबईत परतले, बीएमसीने यादी मागवली, पुढे काय?

कोरोनाची साथ आली तेव्हा मला प्रचंड दडपण आलं होतं, पण मीच खचलो असतो तर… : मुख्यमंत्री

(BMC collected fine of 17 cr. from citizens not wearing mask)