AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटनहून दीड हजार प्रवासी मुंबईत परतले, बीएमसीने यादी मागवली, पुढे काय?

गेल्या महिन्याभरात लंडनहून मुंबईत आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सरकारने महापालिकांना दिले

ब्रिटनहून दीड हजार प्रवासी मुंबईत परतले, बीएमसीने यादी मागवली, पुढे काय?
ब्रिटनमध्ये आता नवीन व्हेरिएंट AY.4.2 ची भीती
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 25, 2020 | 9:46 AM
Share

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या अवतारामुळे भारतासह सर्वच देशात धाकधूक वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 नोव्हेंबरपासून इंग्लंडहून किती प्रवासी आले, याचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत या काळात सुमारे दीड हजार प्रवासी ब्रिटनमधून आल्याचे आढळले आहे. मुंबई महापालिकेने त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. (More than thousand Visitors returned Mumbai from Britain from last month)

गेल्या महिन्याभरात लंडनहून मुंबईत आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व महापालिकांना दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेनेही अशा सर्व प्रवाशांना आवश्यक ती काळजी घ्यावी आणि कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ पालिकेच्या वॉर रुमशी संपर्क साधावा, कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले होते.

मुंबई महापालिकेने विमानतळ प्राधिकरणाकडून मुंबईतील प्रवाशांची यादी गुरुवारी मागवली. त्यानुसार सुमारे दीड हजार प्रवासी या कालावधीत ब्रिटनमधून मुंबईत आले असल्याचे आढळून आले. या सर्व यादीतील प्रवाशांची माहिती पालिकेच्या 24 विभागांकडे पाठवण्यात आली आहे. विभाग कार्यालयांतील नियंत्रण कक्षाद्वारे या प्रवाशांशी संपर्क साधून त्याची माहिती घेण्यात येत आहे.

मुंबईत नाईट कर्फ्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल. नवीन वर्ष उंबरठ्यावर आहे. नाताळपासूनच नववर्षाचा जल्लोष सुरु होतो. या काळात नागरिकांकडून हलगर्जी होऊ नये आणि कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस अनेक जण रात्रभर सेलिब्रेशन करतात. मात्र घराबाहेर एकत्र जमून होणाऱ्या जल्लोषावर मर्यादा यावी, यासाठी अतिरिक्त बंधनं घालण्यात आली आहेत. (More than thousand Visitors returned Mumbai from Britain from last month)

ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन

कोरोनाचा नवा स्ट्रेन जुन्या रुपांपेक्षा अधिक घातक असल्याचं बोललं जातं. जुन्या अवतारांच्या तुलनेत हा वेगाने पसरत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या दोन केसेस सापडल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी दिली आहे. विषाणूचा नवा अवतार दक्षिण आफ्रिकेतून आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ब्रिटनहून आलेले तब्बल 20 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे भारत सरकारने युकेहून (UK) येणाऱ्या प्रवाशांसाठी कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये विमानतळावर प्रत्येकाची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य असेल. निती आयोगचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी मंगळवारी सांगितलं, की याबाबत घाबरण्याची गरज नाही. पण आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

इंग्लंडवरुन नागपुरात आला, तिथून गोंदियाला गेला, कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने विदर्भाला धाकधूक

ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी भारताची लढाई, केंद्र सरकारच्या गाईलाईन्स वाचल्या का?

(More than thousand Visitors returned Mumbai from Britain from last month)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ