दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. (BMC Commissioner Appeal Mumbaikars to be careful)

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. तसेच त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. (BMC Commissioner Appeal Mumbaikars to be careful after Delhi Corona Spike)

राजधानी दिल्लीतील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दिल्लीतील शहीद भगतसिंग ट्रस्टच्या दोन स्वयंसेवकांनी एक व्हिडीओ पोस्ट करत कोरोना स्थितीची गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. हा व्हिडीओतील दोन्ही स्वयंसेवक कोविड मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास मदत करत आहे. तसेच दिल्लीतील नेमकी परिस्थिती कशी आहे, हे सांगितलं आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 7 हजार 546 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कता बाळगली जात आहे.

दिल्लीची कोरोना परिस्थिती बघता मुंबईत नागरिकांनी सावधानता बाळगली पाहिजे. नो मास्क, नो एंट्री’ ही मोहिम आपल्या सर्वांना कोरोनापासून वाचवू शकते. त्यामुळे सर्वांनी मास्क घाला, अशी विनंती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केली आहे.

मुंबईकरांचा जीव वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा, असेही इक्बालसिंग चहल म्हणाले.

हेही वाचा – Mumbai School | दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

दरम्यान राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.

येत्या 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दिल्लीतील परिस्थिती पाहता 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. (BMC Commissioner Appeal Mumbaikars to be careful after Delhi Corona Spike)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

Delhi Corona Cases | दिल्लीत कोरोनाचा कहर, 24 तासात तब्बल 7546 नवे रुग्ण, 98 बाधितांचा मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI