मालमत्ता कर थकवणाऱ्या हॉटेलला पालिकेचा दणका; सांडपणी वाहून नेण्याचा मार्ग बंद

गेल्या आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर न भरणाऱ्यांची चल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. | BMC property tax

मालमत्ता कर थकवणाऱ्या हॉटेलला पालिकेचा दणका; सांडपणी वाहून नेण्याचा मार्ग बंद
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 2:37 PM

मुंबई: कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे मुंबई महानगरपालिकेला (Mumbai BMC) कधी नव्हे ती पैशांची चणचण जाणवू लागली आहे. त्यामुळे आता पालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी थकबाकीदारांकडून वसुली करण्याची मोहीम हाती घेतली आहे. (BMC starting recovery property tax money in Mumbai)

यामध्ये मालमत्ता कर (Poperty Tax) थकविणारे नागरिक आणि आस्थापने पालिकेच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेने कर चुकवेगिरी होणाऱ्या मालमत्तांचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतरही काहीजण वठवणीवर येण्यास तयार नसल्याने आता पालिकेने आणखी कठोर पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता या मालमत्तांची सांडपाणी वाहून नेणारे मार्ग बंद करण्यात येणार आहेत.

मुंबईतील अनेक मालमत्तांचा कर थकलेला आहे. या माध्यमातून पालिकेला जवळपास 20 हजार कोटी रुपयांचा निधी येणे बाकी आहे. त्यामुळे आता पालिकेने चार बडया थकबाकीदारांवर सर्वप्रथम कारवाईचा बडगा उभारला. यामध्ये वांद्रे येथील के विभागातील एका हॉटेलचा समावेश आहे. या हॉटेलने जवळपास 8.7 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. आगामी काळात मुंबईतील इतर थकबाकीदारांवरही अशाचप्रकारची कारवाई होण्याची शक्यता आहे.

महापालिका कर न भरणाऱ्यांकडून अशापद्धतीने वसुली करते

गेल्या आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर न भरणाऱ्यांची चल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दुचाकी, चारचाकी, विविध प्रकारची वाहने, टिव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा (A.C.) यासारख्या वस्तू जप्त करण्यात येत आहेत. या वस्तू जप्त केल्यानंतर ५ दिवसांच्या आत थकीत कराची वसुली न झाल्यास सदर वस्तुंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत कराची वसुली करण्याची तदतूद करण्यात आली आहे.

मालमत्ता कर वसुलीचे टप्पे

1) बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे.

2) जे मालमत्ता धारक 90 दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पेनिहाय कारवाई सुरु करण्यात येते. त्याचबरोबर मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर आवर्ती पद्धतीने दरमहा 2 टक्के या दराने दंड आकारणी करण्यास देखील सुरुवात केली जाते.

3) टप्पेनिहाय कारवाई अंतर्गत सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही देयक अदा न केल्यास ‘डिमांड लेटर’ पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात 21 दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ता धारकास दिली जाते.

4) त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग ‘सील’ (मोहोरबंद) करण्याची कारवाई; त्यानंतर मालमत्ता व्यवसायिक स्वरुपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाई आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता अटकावणीची (Property Attachment) कारवाई करण्यात येते.

5) या व्यतिरिक्त ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888’ मधील कलम 204 व 205 अन्वये दुचाकी, चारचाकी, वाहने, फर्निचर, टिव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यासारख्या चल संपत्ती असणाऱ्या बाबी जप्त करण्याची कारवाई देखील गेल्या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. यानुसार सदर वस्तू जप्त केल्यानंतरही थकीत कराची वसुली पाच दिवसात न झाल्यास सदर वस्तुंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत करांची वसुली केली जाते.

संबंधित बातम्या:

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींची तफावत; काँग्रेसचा घरचा आहेर

मुंबई महापालिकेची एकाच दिवसात बक्कळ कमाई, 8 मार्चला 416 कोटींचा मालमत्ता कर जमा

(BMC starting recovery property tax money in Mumbai)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.