Eknath Shinde : कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही – एकनाथ शिंदे

Eknath Shinde : अनेक पक्षांचे माजी नगरसेवक, माजी महापौरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मागच्या महिन्यात नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश मिळवलं होतं. 61 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले.

Eknath Shinde : कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही - एकनाथ शिंदे
Eknath Shinde
| Updated on: Jan 09, 2026 | 2:53 PM

“कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढत आहोत. मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार. मी तुम्हाला एक सांगतो की मुंबईत महायुतीचाच महापौर होणार” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “आज कात्रज मध्ये सभा पार पडली. कार्यकर्ते उत्साही आहेत. पुण्यात शिवसेना स्वबळावर लढत आहे. ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत आम्हाला जिंकायची आहे. गेली अनेक वर्ष त्यांची सत्ता होती. लोकांनी त्यांचा अनुभव घेतला आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“शिवसेना पहिल्यांदा या ठिकाणी स्वबळावर लढत आहे. पुण्याचा विकास आम्हाला करायचा आहे. पुणेकरांना न्याय मिळेल. आमचा अजेंडा विकासाचा आहे. विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये. नगरपरिषद निवडणुकीत तुम्ही बघितलं. शिवसेना विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महापालिकेसाठी मुंबई आणि ठाण्यात भाजपसोबत युती केली आहे. नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे ते स्वतंत्रपणे लढत आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे.

त्यामुळे पक्षविस्ताराला संधी मिळते

अनेक पक्षांचे माजी नगरसेवक, माजी महापौरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मागच्या महिन्यात नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश मिळवलं होतं. 61 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. भाजपाखोलाखाल शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आता महापालिका निवडणुकीतही अशाच प्रदर्शनाची एकनाथ शिंदे यांना अपेक्षा आहे. मुंबई आणि ठाण्याची महापालिका निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी मागच्या चार वर्षांत प्रचंड मेहनत करुन पक्ष वाढवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता हे कुठल्याही पक्षाचं धैय्य असतं. कारण त्यामुळे पक्षविस्ताराला संधी मिळते. म्हणून राजकारणातील सर्वच पक्ष महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहेत. सध्या सर्व पक्षांच्या प्रचारसभा सुरु आहेत.