
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. मुंबई महानगर पालिकेत काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला होता. मात्र कालच काँग्रेसेने वंचित सोबत आघाडी केल्याने आता काँग्रेसने पहिली यादी जाहीर केलेली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत एकूण 87 उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत काँग्रेसने कोणा-कोणाला उमेदवारी जाहीर केली आहे आणि कोणाला तिकीट दिले आहे हे वाचूयात.
कोणाला मिळाली संधी –
येथे पाहा पोस्ट –
आम्ही प्रत्येक मुंबईकराच्या हक्कासाठी लढू!
एकता, संघटन आणि जमिनीवरच्या तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर, मुंबई काँग्रेस या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी आणि निर्धाराने उतरली आहे. आम्ही सामान्य मुंबईकरासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढू. निवडणूक आव्हानात्मक आहे, ही लढाई आहे सर्वसामान्य… https://t.co/obv2yrJD0Y
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 29, 2025
काँग्रेस पक्षाच्या पहिल्या यादीत काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावांचा समावेश केला आहे. खासदार चंद्रकांत हंडोरे यांची लेक प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग क्रमांक 140 मधून उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील 29 महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन महायुती आणि आघाडीत चढाओढ सुरु आहे. त्यातच महायुतीच्या विरूद्ध उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. जागावाटपासाठी जोरदार चढाओढ सुरु असतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला असताना आता वंचित सोबत आघाडी केली आहे.