AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Elections: मुंबईतील अतिरिक्त 9 वॉर्ड शिवसेनेला तारणार की भाजपला?; या निर्णयामागे नेमकं दडलं काय?

फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिका मुंबईत नवीन प्रभाग जोडण्याचा विचार करत असल्याची घोषणा झाली तेव्हा भाजपने आरोप केला होता की हे शिवसेनेच्या सोयीसाठी केले जात आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पण भाजपसोबत युतीकरून. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

BMC Elections: मुंबईतील अतिरिक्त 9 वॉर्ड शिवसेनेला तारणार की भाजपला?; या निर्णयामागे नेमकं दडलं काय?
BMC elections
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 1:42 PM
Share

मुंबईः बृहन्मुंबई महापालिकेतील (BMC new 9 wards) अतिरिक्त नऊ प्रभागांना राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. अशा प्रकारे, 2022 ला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (elections) आता 227 ऐवजी एकूण 236 प्रभाग असतील. पालिका सुधारित प्रभागांच्या सीमांकनासह सज्ज झाली आहे. मात्र, अंतिम मसुदा मंजुरीसाठी आठवडाभरात राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल, अशी माहिती आहे. नवीन प्रभागांचे सीमांकन जाहीर झाल्यानंतर त्यावर रहिवाशांच्या सूचना व हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर जागांच्या आरक्षणाची लॉटरीही काढली जाईल. या सर्व प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थिती, येत्या फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणार आहे. पण, ते पुढे ढकलले जाऊ शकते. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यास, निवडणुकीच्या तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळेल आणि अतिरिक्त निवडणूक प्रभागांचा राजकीय पक्षांना फायदाच होणार आहे.

अतिरिक्त प्रभागांमुळे राजकीय पक्षांना मदत

आता मुंबईत नऊ वॉर्ड वाढले असल्याने ते नियमानुसार शहरातील लोकसंख्येनुसार चिन्हांकित केले जातील. मतदानाच्या टक्केवारीत प्रभागांची फेररचना महत्त्वाची भूमिका बजावेल, हे निश्चित. फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिका मुंबईत नवीन प्रभाग जोडण्याचा विचार करत असल्याची घोषणा झाली तेव्हा भाजपने आरोप केला होता की हे शिवसेनेच्या सोयीसाठी केले जात आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, पण भाजपसोबत युतीकरून. मात्र, यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष- शिवसेना आणि भाजप आता एकत्र राहिले नाहीत. 2019 च्या राज्य निवडणुकांनंतर, शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यामुळे आता एक प्रकारे नगरपालिका निवडणुका भाजप एकट्याने लढत असून राज्यातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे भाजप मनसेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे अलीकडे दिसून आले आहे.

एकूणच, यावेळच्या महापालिका निवडणुकीतील राजकीय डावपेच वेगळे होणार असून, अतिरिक्त निवडणूक प्रभागांमुळे चित्र अधिक बदलणार आहे.

2017 च्या निवडणुकीतही शिवसेना-भाजपमध्ये चुरशीची लढत

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 227 वॉर्डांपैकी 105 वॉर्डांसाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. 51 प्रभागातील उमेदवार केवळ 0 ते 5 टक्क्यांच्या फरकाने विजयी झाले. तर 54 प्रभागांसाठी 5 ते 10 टक्के मतदानाच्या फरकाने उमेदवार विजयी झाले होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर ज्यांना महापौरपदी नियुक्त करण्यात आले होते, त्यांनी त्यांच्या प्रभागात भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अवघ्या 34 मतांनी विजय मिळवला.

शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिका निवडणूक एकट्याने लढवली आणि भाजपने शिवसेनेला अत्यंत चुरशीची लढत दिली. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबईत भाजपने अनेक जागा जिंकल्या. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांनी पुन्हा युती करून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन केली. मात्र, राज्यात शिवसेना-भाजप हे पक्ष सध्या एकत्र नाहीत. आणि शिवसेनेची सध्या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती आहे.

ही राजकीय जुळवाजुळव पाहता मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांसाठी कमालीची उत्कंठावर्धक आणि चुरशीची होणार आहे.

इतर बातम्या-

Devendra Fadnavis: आमच्या आदर्शांनाच अपमानित केलं जात असेल तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?; फडणवीसांचा थेट सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्जिकल स्ट्राईकचा साक्षीदार लाल महालसुद्धा पुण्यात, पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय? अमोल कोल्हेंचा सवाल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.