AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता अजय देवगण याला मोठा दणका, थेट बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा, बीएमसीने..

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. थेट महापालिकेने अजय देवगण याला दणका दिला. अजय देवगण याच्या घरावर हातोडा महापालिकेकडून चालवण्यात आला. थेट कारवाई करण्यात आली.

अभिनेता अजय देवगण याला मोठा दणका, थेट बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा, बीएमसीने..
Ajay Devgn
| Updated on: Oct 17, 2026 | 10:47 AM
Share

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अजय देवगण याला एफडीएकडून थेट नोटीस पाठवण्यात आली. पान मसाल्याची जाहिरात केल्याने अजय देवगण अडचणीत असतानाच बीएमसीकडून त्याला मोठा दणका देण्यात आला. अजय देवगण यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर बीएमसीचा हातोडा चालवला आहे. थेट मोठा दणकाच दिला. नोटीस देऊनही काम न थांबवल्याने पालिकेकडून कारवाई करण्यात आली. अगोदर पालिकेने यासंदर्भात अजय देवगण याला नोटीस दिली होती. मात्र, नोटीस देऊनही अजय देवगण याच्याकडून काम थांबवण्यात आले नाही. अखेर थेट कारवाईच करण्यात आली. अजय देवगण यांच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने ही मोठी कारवाई केली.

पालिकेने काम थांबवण्याची नोटीस देऊनही बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिकेने बंगल्यातील काही बांधकाम पाडले आहे. अजय देवगण यांचा जुहू येथील कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे. या बंगल्यातील अंतर्गत बदल, विभाजनाच्या भिंती, खिडक्या आणि इतर कामांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोप आहे. कोणतीही परवानगी नसताना हे बांधकाम सुरू होते.

याबाबत नोटीसही महापालिकेकडून देण्यात आली. पण महापालिकेच्या या नोटीसला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद हा अजय देवगण याच्याकडून देण्यात आला नाही. शेवटी पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 354A अंतर्गत नोटीस बजावली होती. हे काम थांबवावे, असे स्पष्ट शब्दात पालिकेने नोटीसमध्ये स्पष्ट केले.

काम तातडीने थांबवून आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, नोटिशीनंतरही काम सुरू राहिल्याने पालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. महापालिकेने नोटीस देऊनही काम सुरूच ठेवण्यात आले होते. शिवाय कोणत्याही प्रकारची परवान्यासाठीची प्रक्रिया करण्यात आली नाही. शेवटी महापालिकेने कारवाई सुरू केली. अजय देवगण या बंगल्यात आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. अजयने बांधकामासाठी परवाना घेतला नसल्याचा आरोप आहे. एफडीएच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा अजय देवगण चर्चेत आला.

Follow Us
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...