BMC : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, आर्थिक घडी सावरण्यासाठी बीएमसीचा मालमत्ता कर वसुलीवर जोर

मार्च 2020 पासून कोरोना संसर्गामुळं लॉकडाऊन (Lockdown) आणि त्यानंतर अनलॉकच्या काळातील निर्बंधांमुळं महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे.

BMC :  मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, आर्थिक घडी सावरण्यासाठी बीएमसीचा मालमत्ता कर वसुलीवर जोर
BMC
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 8:41 AM

मुंबई: मुंबई महापालिकेला(BMC)  कोरोना (Corona) विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. मार्च 2020 पासून कोरोना संसर्गामुळं लॉकडाऊन (Lockdown) आणि त्यानंतर अनलॉकच्या काळातील निर्बंधांमुळं महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. मुंबई महापालिकेला कोरोना संसर्गाच्या काळात आरोग्य यंत्रणा उभारणीवर खर्च करावा लागल्यानं आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी मुंबई महापालिकेसमोर मालमत्ता कर (Property Tax) वसुली हा पर्याय उरला आहे.

पालिकेला मालमत्ता कराचा आधार

कोरोनामुळे लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे विस्कटलेली आर्थिक घडी, आरोग्य व्यवस्थेवर करावा लागलेला प्रचंड खर्च या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेसमोर अर्थसंकट उभे राहिले असल्याची माहिती समोर आली आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे.विभागाला पहिल्या सहामाहीअखेरीस करदात्यांकडून तब्बल 2,287.29 कोटी रुपये वसूल करण्यात यश मिळाले आहे.

सहामाही करवसुलीत वाढ

मुंबई महापालिकेनं मागील वर्षांच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यावर्षी चांगली करवसुली केली आहे. यंदा करवसुलीत सुमारे 322.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मुंबई महापालिकेसमोर उर्वरित सहा महिन्यांमध्ये पावणेपाच हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्याचे आव्हान आहे.

मालमत्ता कर बनला मुख्य स्त्रोत

मुंबई महापालिकेला सध्या मोठा महसूल मिळवून देणारा मालमत्ता कर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. मागील आर्थिक वर्षांमध्ये (2020-21) मध्ये कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे कर वसुलीत मोठी तूट आली होती. या वर्षांत 6768.58 कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र ,कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन मालमत्ता करापोटी मिळणारे उत्पन्न 4500 कोटी रुपये इतके सुधारित करण्यात आले होते. मात्र तेही साध्य करणे अवघड होत आहे.

इतर बातम्या:

मुंबईकर सावध हो! ओमिक्रॉनच्या ‘धोकादायक’ देशातून अडीच हजारापेक्षा जास्त जण मुंबईत, काय आहे BMC तयारी?

अमरावती हिंसाचार हा संयोग नव्हे तर प्रयोग होता, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप; ‘अर्बन नक्षलवादा’वर जोरदार प्रहार

BMC started property tax collection for this economic year set target collect 4500 crore rupees till March

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.