AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana: राणा दाम्पत्यांच्या घरावर कारवाई होणार?, पालिका अधिकाऱ्यांची आधी नोटीस, नंतर पाहणी आता पुन्हा पाहणी

Navneet Rana: खारमध्ये राणा दाम्पत्यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये त्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका पालिकेने ठेवला आहे.

Navneet Rana: राणा दाम्पत्यांच्या घरावर कारवाई होणार?, पालिका अधिकाऱ्यांची आधी नोटीस, नंतर पाहणी आता पुन्हा पाहणी
राणा दाम्पत्यांच्या घरावर कारवाई होणार?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 09, 2022 | 9:26 AM
Share

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (ravi rana) यांच्या मागील अडचणींचा सिसेमिरा काही सुटताना दिसत नाहीये. हनुमान चालिसा (hanuman chalisa) प्रकरणातून सुटका झाल्यानंतर आता राणा दाम्पत्यांच्या मागे घरातील अनधिकृत बांधकामांचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. राणा दाम्पत्यांनी खार येतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा पालिकेला संशय आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी आज राणा यांच्या घरी जाऊन पाहणी करणार आहेत. यापूर्वीही पालिकेचे अधिकारी राणा यांच्या घरी गेले होते. या अधिकाऱ्यांनी राणा यांच्या घराची पाहणी करून नोटीस बजावली होती. मात्र, राणा दाम्पत्य तुरुंगात असल्याने पालिका अधिकारी घरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करू शकले नव्हते. आता मात्र, राणा दाम्पत्य घरी आल्याने आज पुन्हा एकदा पालिकेचे अधिकारी त्यांच्या घरी जाणार असून घरातील बेकायदा कामांची पाहणी करून अहवाल तयार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

खारमध्ये राणा दाम्पत्यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये त्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका पालिकेने ठेवला आहे. याप्रकरणी 4 मे रोजी पालिकेचे अधिकारी राणा दाम्पत्यांच्या घरी गेले होते. या घराची पाहणी करून त्यांनी घराला नोटीसही बाजवली होती. फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम झाल्याचं या नोटिशीत म्हटलं होतं. मात्र, राणा दाम्पत्य तुरुंगात असल्याने कारवाई होऊ शकली नव्हती.

तुरुंगातून सुटका

राणा दाम्पत्यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर रवी राणा तुरुंगातून बाहेर आले. तर आजारी असल्याने नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चार दिवसांच्या उपचारानंतर नवनीत राणा यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज पालिकेचे अधिकारी राणा दाम्पत्यांच्या घरी जाणार असून अनधिकृत बांधकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर अहवाल तयार केला जाईल. राणा दाम्पत्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

राणा दाम्पत्य आज दिल्लीत

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा आज दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत जाऊन नवनीत राणा या त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देणार आहेत. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांचीही तक्रार करणार आहेत. नवनीत राणा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?