AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी केवळ 200 रुपयात, सरकाराचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Ancestral Land Shares just 200 Rupees: वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्श्यांच्या मोजणीसाठी मोठा खर्च येतो. वाद असेल तर मग मोजणीसाठी दोन्ही पक्षांना मोठा खर्च करावा लागतो. पण आता राज्य सरकारने यासंदर्भात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मोठी बातमी! वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी केवळ 200 रुपयात, सरकाराचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी केवळ 200 रुपयातImage Credit source: गुगल
| Updated on: Dec 07, 2025 | 10:39 AM
Share

Chandrashekhar Bawankule: वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता माफक दरात होणार आहे. शेतकरी कुटुंबात जमिनीच्या पोटहिश्शांबाबत मोजणी करण्यात येते. त्यात वाद असेल तर मग झटपट नोंदणी करावी लागते. या सर्वांसाठी मोठा खर्च येतो. पण आता वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी अत्यंत कमी दरात म्हणजे केवळ प्रति पोटहिस्सा 200 रुपयांत होणार आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयांची माहिती संबंधित जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला देण्यात आली आहे. या नवीन निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात पोटहिस्सा मोजणीसाठी जेव्हा अर्ज येईल, तेव्हा त्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 200 रुपये द्यावे लागतील.

यापूर्वी इतका मोठा खर्च

यापूर्वी वडिलोपार्जित पोटहिस्सा मोजणीसाठी 1 हजार रुपये ते 14 हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता. या मोठ्या खर्चामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भारत पडत होता. केवळ मोजणीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागत होती. भूमी अभिलेख विभागाने आता शुल्क संरचनेत मोठा बदल केला आहे. पोटहिस्सा मोजणीसाठी आता केवळ 200 रुपये खर्च येणार आहे. हा निर्णय आता राज्यभर लागू करण्यात आला आहे.

एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी

महाभूअभिलेख संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आता नवीन दरांची माहिती दिसेल. तसेच एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी हा पर्याय सुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे. ई-मोजणी व्हर्जन 2.0 या संगणक प्रणालीतही अद्ययावत बदल करण्यात आले आहेत. जमिनीचे वाद कमी करण्यासाठी सरकारने हा बदल केला आहे. तर पोटहिस्सा मोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. कुटुंबातील जमिनीच्या वाटणी संदर्भातील वाद यामुळे कुटुंबातील सदस्यांचा खिसा खाली होणार नाही. जमाबंद आयुक्त आणि भूमि अभिलेख विभागाच्या संचलाकांनी या संदर्भातील पत्र जारी केले आहे. यापूर्वी प्रतिहिस्सा मोजणी ही दोन प्रकारात होत होती. एक साधी आणि एक जलद अशा दोन प्रकारे मोजणी होत होती. त्यासाठी त्याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत होते. जलद मोजणीसाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. आता हा खर्च कमी झाला आहे.

अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!.
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार.
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत.
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल.
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू.
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर.
अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा
अजित पवार अमर रहे! रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा.
अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माळी यांचा विमान अपघातात अंत
अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माळी यांचा विमान अपघातात अंत.
बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी आणि जनाक्रोश
बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी आणि जनाक्रोश.