शिमगा सण साधेपणाने साजरा करा, उदय सामंत यांचे आवाहन

शिमगा सण साधेपणाने साजरा करावा, असे उदय सामंत म्हणाले. (Holi festival Uday Samant)

  • लक्ष्मीकांत घोणसे पाटील, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी
  • Published On - 19:31 PM, 22 Feb 2021
शिमगा सण साधेपणाने साजरा करा, उदय सामंत यांचे आवाहन
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

रत्नागिरी : सर्वात मोठा श्रद्धेचा आणि परंपरेचा सण म्हणून कोकणात शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिमगा सण साधेपणाने साजरा करा, असे आवाहन उच्च  आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. (Celebrate Holi festival with simplicity Uday Samant appeal)

येत्या काही दिवसात शिमगा सण हा कोकणचा आपला घरचा सण येणार आहे. मात्र सध्या परिस्थितीचा विचार करता हा सण साजरा करा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे शिमगा सण साधेपणाने साजरा करावा, असे उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जे लोक सार्वजनिक कार्यक्रम विनापरवाना करतील, त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत. ‘मी जबाबदार’ या मोहिमेअंतर्गत दोन्ही जिल्ह्यात सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.  ग्रामीण भागातील क्रीडा स्पर्धा आणि स्नेहसंमेलन थांबवावीत, असे उदय सामंत म्हणाले.

लग्नसमारंभ आणि हॉलच्या बाबत दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धा खो खो स्पर्धा स्नेहसंमेलन इत्यादी गोष्टी काही काळाकरिता बंद कराव्यात, असेही आवाहन सामंत यांनी केले.(Celebrate Holi festival with simplicity Uday Samant appeal)

संबंधित बातम्या :

‘कोरोनाला नंतर बघू, आधी लॉकडाऊनचा बंदोबस्त करु’, डी मार्टबाहेर खरेदीदारांची त्सुनामी

पुण्यात कोरोनाच कहर वाढला; कोरोनामुक्त, कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सारखेच, चिंता वाढली

कोणकोणत्या जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी?, वाचा सविस्तर रिपोर्ट