AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकलचा वेग मंदावणार, मध्य रेल्वेवर 5 दिवसांचा स्पेशल ब्लॉक; दुपारी आणि रात्रीचे वेळापत्रक कसं असणार?

मध्य रेल्वेच्या कसारा-इगतपुरी सेक्शनमध्ये तांत्रिक कामासाठी १२ ते १६ मे २०२६ दरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. या काळात कसारा लोकलच्या वेळापत्रकात झालेले बदल आणि रद्द झालेल्या गाड्यांची सविस्तर माहिती येथे वाचा.

मुंबई लोकलचा वेग मंदावणार, मध्य रेल्वेवर 5 दिवसांचा स्पेशल ब्लॉक; दुपारी आणि रात्रीचे वेळापत्रक कसं असणार?
mumbai local
| Updated on: May 12, 2026 | 1:06 PM
Share

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कसारा आणि इगतपुरी दरम्यान तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. मंगळवार १२ मे ते शनिवार १६ मे २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे उत्तर-पूर्व मार्गावरील उपनगरीय लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. यात प्रामुख्याने कसारा आणि आसनगाव दरम्यानची सेवा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

तांत्रिक कामाचे स्वरूप आणि वेळ

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कसारा (इगतपुरी-खर्डी सेक्शन) दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) संबंधित अडथळे दूर करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या पूर्वतयारीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. यानुसार १२ आणि १३ मे रोजी दुपारी १५:५० ते १७:५० असे दोन तास या मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात मुख्य लाईनवर काम चालेल. तर १४ मे ते १६ मे या काळात रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मध्यरात्री ३:०० ते पहाटे ५:०० या वेळेत घेतला जाणार असून त्या काळात काम केले जाईल.

लोकल गाड्यांच्या फेऱ्यांत कपात

१२ आणि १३ मे रोजी दुपारी होणाऱ्या ब्लॉकमुळे अनेक कसारा लोकल आसनगाव स्थानकातच रोखल्या जातील. तसेच सीएसएमटी येथून दुपारी १३:१०, १४:१७ आणि १४:४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल केवळ आसनगावपर्यंतच धावतील. परतीच्या प्रवासात, कसारा येथून सुटणाऱ्या गाड्या (N24, N26, N28) कसाराऐवजी आसनगाव स्थानकातून अनुक्रमे १६:१२, १६:५४ आणि १७:३९ वाजता मुंबईसाठी रवाना होतील. यामुळे कसारा ते आसनगाव दरम्यानच्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

य ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने शेवटच्या आणि पहिल्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कसारासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल दुपारी १२:३० वाजता सीएसएमटी येथून सुटेल, तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल सायंकाळी १६:५० वाजता सुटेल. कसारा येथून मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची गाडी दुपारी १४:४२ वाजता सुटेल. ब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल सायंकाळी १८:१७ वाजता मार्गस्थ होईल.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांची स्थिती

या दुपारच्या ब्लॉकमुळे केवळ लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न रेल्वेचा आहे. रात्रीच्या ब्लॉकचा कोणत्याही गाड्यांवर परिणाम होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी या बदलांची नोंद घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी ही देखभाल कामे आवश्यक असून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?