AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्जे बात… थर्टीफर्स्टसाठी मध्य रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय; रात्रभर लोकल…

मध्य रेल्वेने थर्टीफर्स्टची रात्र आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे नववर्षाच्या निमित्ताने 31 डिसेंबरच्या मध्य रात्री स्पेशल ट्रेन चालवणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत येणाऱ्या तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

ज्जे बात... थर्टीफर्स्टसाठी मध्य रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय; रात्रभर लोकल...
| Updated on: Dec 26, 2023 | 9:31 PM
Share

मुंबई | 26 डिसेंबर 2023 : राज्यभरात सध्या नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे. नाताळच्या निमित्ताने अनेक खासगी कार्यालयांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे कर्मचारी सुट्टींचा आनंद घेण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळी गेले आहेत. दरवर्षी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरीक रात्री उशिरापर्यंत जागतात. मुंबईत तर गेट ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, गोराई, मढ, दादर चौपाटी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची तुफान गर्दी होते. सरत्या वर्षाला बायबाय आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई उपनगरातील लाखो नागरीक, तरुण-तरुणी मुंबईच्या चौपाट्यांवर दाखल होतात. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

थर्टीफर्स्टच्या निमित्ताने 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईत येणाऱ्या नागरिकांना रात्री उशिरा परत घरी जाण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 4 विशेष उपनगरीय रेल्वे चालविणार आहे. त्यामुळे मुंबईत रात्री उशिरा सेलिब्रेशनला येणाऱ्या नागरिकांना, तरुण-तरुणींना घरी परत जाण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. खरंतर थर्टीफर्स्ट आणि नववर्षाच्या दिवशी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना हे एक गिफ्ट देण्यासारखंच आहे. मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन म्हणतात. मुंबईकर या लोकलच्या बाबतीत खूप संवेदनशील आणि हळवा आहे. दसरा, दिवाळीला मुंबईकर आणि उपनगरात वास्तव्यास असणारे प्रवासी मुंबई लोकलची पुजा करतात. याची जाणीव रेल्वे प्रशासनाला देखील असल्याची यातून दिसून येत आहे.

मध्य रेल्वे थर्टीफर्स्टच्या रात्री ‘या’ विशेष लोकल ट्रेन चालवणार

मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री) प्रवाशांकरीता खालीलप्रमाणे विशेष उपनगरीय सेवा चालविणार आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ /१.१.२०२४ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
  • कल्याण येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन

  • विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२३ / १.१.२०२४ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि ०२.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
  • पनवेल येथून विशेष ट्रेन दि. ३१.१२.२०२२/१.१.२०२३ च्या मध्यरात्री ०१.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल.

सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील. प्रवाशांनी याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, असं मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....