AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प; कामावर जाणाऱ्यांची तारांबळ

शेलू आणि नेरळदरम्यान डेक्कन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील डाऊन मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे वाहतुकीचे अपडेट्स जाणून घ्या..

मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प; कामावर जाणाऱ्यांची तारांबळ
मध्य रेल्वे लोकलImage Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2026 | 11:00 AM
Share

मध्य रेल्वेच्या शेलू आणि नेरळ स्थानकांदरम्यान डेक्कन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्यान एक्स्प्रेससह कर्जत लोकलसुद्धा वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबली आहे. यामुळे डाऊन मार्गावरील मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल बदलापूर रेल्वे स्थानकात रद्द करण्यात आली आहे. वांगली स्थानकावर रेल्वे खोळंबल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. तर सीएसएमटी, ठाणे, कल्याण आणि कर्जत-खोपोली मार्गावरही प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे कार्यालयांसाठी निघालेल्या नोकरदार वर्गाचाही खोळंब झाला आहे. ऑफिस गाठणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आज लेट मार्कचा त्रास सहन करावा लागणार आहे. आठवड्यातून अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणाने मध्य रेल्वेची वाहतून उशिराने सुरू असल्याचं पहायला मिळतं. त्यात आता डेक्कन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण समोर आलं आहे.

चाकरमान्यांचे हाल

सकाळची वेळ ही गर्दीची असते. त्याचवेळी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे. मध्य रेल्वेची वाहतून सुरळीत होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल याबाबतची माहिती अद्याप रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. तरी लवकरच हे काम पूर्ण होईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. वांगणी, बदलापूर, अंबरनाथ इथून रोज सकाळी चाकरमानी मोठ्या प्रमाणात मुंबईला ऑफिसला जाण्यासाठी निघतात. मात्र आज सकाळी डाऊन मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याने चाकरमान्यांना ऑफिस गाठण्यास उशीर होत आहे.

कर्जत-खोपोलीच्या गाड्या बदलापूर रेल्वे स्थानकातून रवाना

मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस ही सकाळी सात वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघते. या वेळेनुसार ही एक्स्प्रेस आजही सीएसएमटी स्थानकातून निघाली. मात्र शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान या एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे डाऊन मार्गावरील गाड्या खोळंबून रेल्वे वाहतून ठप्प झाली. उद्यान एक्सप्रेससह कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबल्या आहेत. तर डाऊन मार्गावरील कर्जत-खोपोलीच्या गाड्या बदलापूर रेल्वे स्थानकातूनच सीएसएमटी स्थानकाकडे पाठवण्यात येत आहेत. डेक्कन एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतरच ही एक्सप्रेस पुढे रवाना होईल आणि त्यानंतरच खोळंबलेल्या लोकल सोडण्यात येतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय