Chandrakant patil: आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडा; चंद्रकांतदादांचं ओबीसींना आवाहन

Chandrakant patil: आपण सभा आणि मोर्चे खूप काढतो. पण भाजप कार्यकर्त्यांनी लोकांशी व्यक्तिगत संवाद ठेवला पाहिजे.

Chandrakant patil: आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडा; चंद्रकांतदादांचं ओबीसींना आवाहन
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 5:16 PM

मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या (obc reservation) मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. कोर्टाने लवकरात लवकर ट्रिपल टेस्ट करण्यास या सरकारला सांगितलं. पण या सरकारने कानाडोळा केला. ठरवून मराठा समाजाचे आरक्षण (maratha reservation) टिकवण्याचा प्रयत्न यांनी केला नाही. ओबीसींच्या आरक्षणाचंही तेच केलं. यांना सगळं कळत तरी सुद्धा यांना करायच नाही. पोटात दुखणं तसा हा प्रकार आहे. ओबीसी राजकीय आरक्षण नसेल तर मग माहापौर, पंचायत, नगरपालिकांमध्ये प्रतिनिधित्व कसे मिळेल? असा सवाल करतानाच आता या सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे. त्यासाठी आपल्याला संघर्ष करावाच लागेल. पाच वर्ष आरक्षण नसेल, त्यामुळे आपण शांत बसणार नाही. आपल्याला गावोगावी जाऊन संघर्ष करावा लागणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईत भाजपच्या ओबीसी मोर्चाने एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते.

वार्डामध्ये जरी आरक्षण जरी नसले तरी आम्ही ओबीसी पुरुष आणि महिलांना 27 टक्के राजकीय आरक्षण देणार आहोत. मात्र, आरक्षण घालवणाऱ्या या सरकारला घेराव घाला. त्यांना जीआर दाखवा की प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल देणार होता त्याचं काय झालं? आरक्षणाची लढाई ही सोयीसुविधांची लढाई आहे. सरकारने दिलेल्या सुविधा समाजाला मिळवून द्यायच्या आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

म्हणून सभा घ्या

आपण सभा आणि मोर्चे खूप काढतो. पण भाजप कार्यकर्त्यांनी लोकांशी व्यक्तिगत संवाद ठेवला पाहिजे. भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळेच सभा घ्यायच्या आहेत. सभांमुळे हे गैरसमज दूर होणार आहेत. लोकांच्या घरी जाऊन किंवा चार जणांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साध्याला हवा, असं त्यांनी सांगितलं. राज्यातील 68 जिल्हा अध्यक्षांना मी स्वतः फोन करणार आहे. जिल्ह्याच्या अध्यक्षाला कोणत्या कार्यक्रमावर मंचावर बोलवायचे आहे हे या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.