AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांचा अर्ज बाद होणार?, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; वाचा नेमकं काय म्हणाले?

राज्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. (chandrakant patil's big statement on congress rajya sabha candiadate)

काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांचा अर्ज बाद होणार?, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; वाचा नेमकं काय म्हणाले?
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 12:51 PM
Share

मुंबई: राज्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. अर्ज छाननीतून रजनी पाटील बाहेर पडतील, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे रजनी पाटील या राज्यसभेच्या मैदानातून बाद होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. (chandrakant patil’s big statement on congress rajya sabha candiadate)

भाजपकडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेसाठी आज नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. रजनी पाटील यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहेत. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावा पाटील यांनी केला. मात्र, काय ऑब्जेक्शन आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मी कशाला सांगू. उद्यासाठी काही हवं की नाही, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

सातव यांच्या पत्नीला तिकीट का नाही दिलं?

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, असं काँग्रेसने अप्रत्यक्ष म्हटलं होतं. त्यासाठी राज्याची परंपराही काँग्रेसने सांगितली होती. त्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची परंपरा वगैरे तुम्हाला आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिलं नाही? राजीव सातव हे प्रविण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, संजय उपाध्याय, देवेंद्र फडणवीसांचे परम मित्रं होते. त्यामुळे सातव यांच्या पत्नीला तिकीट मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण तुम्ही रजनी पाटलांना तिकीट दिलं, असं ते म्हणाले.

व्हीप मोडला तरी निलंबित होत नाही

भाजपचा उमेदवार कसा निवडून येणार यावरही त्यांनी काही गणितं मांडली. दोन गोष्टींचा शकून घडला. 12 निलंबित आमदारांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यांना फक्त आवारात जाता येणार नाही. गेटवर जाऊन मतदान करता येणार आहे. राष्ट्रपती आणि राज्यसभेच्या निवडणुकीत व्हीप मोडला तर डिस्कॉलिफिकेशन होत नाही. त्यासाठी धाडस लागतं. मी कुणाला मतदान करणार आहे हे दाखवावं लागतं. पण त्यामुळे निलंबित होण्याची भीती याबाबत नसते, असं त्यांनी सांगितलं.

ते होऊ शकतात, आम्ही का नाही?

राजकारणात काहीही होऊ शकतं. 56 वाले मुख्यमंत्री होतात. 54 वाले उपमुख्यमंत्री होतात. 44 वाले महसूल मंत्री बनतात. आमचे 106 आणि 13 अपक्ष आमदार म्हणजे 119 आमदार होतात. मग 119 वालेही राज्यसभेत जाऊ शकतात. उपाध्याय राज्यसभेत जाणारच. अजून अपक्ष मिळाले तर 127 किंवा 128 चा आकडाही आम्ही गाठू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

राजकारणात चान्स घ्यावा लागतो

राजकारणात चान्स घ्यायचा असतो. प्रत्येकवेळी यशस्वी होतो असं नाही. पण अयशस्वी होतो असंही नाही. कशात काय आणि फाटक्यात पाय असतानाही ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री होऊ शकतात. ते होऊ शकतं तर हेही होऊ शकतं. आम्ही प्रयत्न करत आहोत.

पाटील दुपारी अर्ज भरणार

दरम्यान, काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. (chandrakant patil’s big statement on congress rajya sabha candiadate)

संबंधित बातम्या:

संजय राऊत मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

‘मुका’ घेण्याचं वक्तव्य महागात, रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसात तक्रार

कायदेशीर सल्ल्याला किती वेळ लागतो?, ओबीसी आरक्षण अध्यादेशावरून राऊतांचा राज्यपालांना सवाल

(chandrakant patil’s big statement on congress rajya sabha candiadate)

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.