AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेंबूरमध्ये 3 दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण, डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट, पतीचा आरोप

चेंबूरमधील एका रुग्णालयात 3 दिवसांच्या बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Chembur Baby Tested Corona Positive) आहे.

चेंबूरमध्ये 3 दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण, डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट, पतीचा आरोप
| Updated on: Apr 01, 2020 | 11:17 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 335 वर पोहोचला (Chembur Baby Tested Corona Positive) आहे. मुंबईत आज 30 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 181 वर पोहोचली आहे. यामुळे प्रशासनाकडून वारंवार खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे मात्र चेंबूरच्या एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबूरमधील एका रुग्णालयात 3 दिवसांच्या बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.

चेंबूरमध्ये तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली (Chembur Baby Tested Corona Positive) आहे. या बाळाची प्रकृती नाजूक आहे. ही बातमी कळल्यानंतर या बाळाच्या पित्याला अश्रू अनावर झाले. पत्नीच्या डिलिव्हरी वॉर्डात कोरोना पेशंट असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी बनवला आहे.

या व्हिडीओत त्यांना त्या रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ तयार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष देण्याची विनंती केली आहे. दरम्यान या बाळावर आणि त्याच्या आईवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 335 वर पोहोचला आहे. आज (1 एप्रिल) दिवसभरात 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात 30 रुग्ण हे मुंबईतील असून दोन पुण्यातील आणि एक बुलडाण्यातील रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 335 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज दिवसभरात 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला (Chembur Baby Tested Corona Positive) आहे.

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धारावीत झोपडपट्टीत राहणाऱ्या 55 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच तो राहत असलेली इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. या व्यक्तीने कुठेही परदेशी प्रवास केलेला नाही. त्याच्या घरातील 8 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 181 पुणे – 38 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  16 कल्याण – 10 नवी मुंबई – 8 अहमदनगर – 8 ठाणे – 8 वसई विरार – 6 यवतमाळ – 4 बुलडाणा – 4 पनवेल – 2 सातारा – 2 कोल्हापूर – 2 पालघर- 1 उल्हासनगर – 1 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 335

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...