AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेंबुरमध्ये रेशन खरेदीसाठी झुंबड, मिरा भाईंदरमध्ये भाजी मंडईत मोठी गर्दी

नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असल्याचं सांगत आहेत. मात्र मंडईत सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजल्याचं दिसून येत आहे. (Chembur Ration Store Queue)

चेंबुरमध्ये रेशन खरेदीसाठी झुंबड, मिरा भाईंदरमध्ये भाजी मंडईत मोठी गर्दी
| Updated on: Apr 15, 2020 | 12:37 PM
Share

मुंबई : ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करुन 24 तास होण्याआधीच मुंबईत याचा फज्जा उडताना दिसत आहे. चेंबुरमध्ये रेशन धान्य खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. (Chembur Ration Store Queue)

चेंबुरमध्ये रेशन दुकानात खरेदीसाठी 500 मीटरपर्यंत रांग लागली. दुकान उघडण्यास उशीर झाल्यामुळे गर्दी वाढतच गेली. सकाळी नऊ वाजेपर्यंत चेंबुरमधील रस्त्यावर गर्दीच गर्दी झाली होती. चुनाभट्टी पोलिसांच्या प्रयत्नांना स्थानिकांकडून हरताळ फासण्यात आला.

विशेष म्हणजे तैनात पोलिसांकडूनही कसलीच कारवाई न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता रेशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच चुनाभट्टीत दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे 50 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, मिरा भाईंदरमध्येही सर्व ठिकाणी भाजी मंडईमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. भाईंदर पश्चिमकडे सुभाष चंद्र बोस मैदान, भाईंदर पूर्व विपी रोड, मिरा रोडच्या नयानगर तसेच इतर ठिकाणीही भाजी मंडईमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. (Chembur Mira Road Ration Store Queue)

मिरा भाईंदरमध्ये भाजी मंडई 15 ते 17 एप्रिलपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत सुरु करण्यासाठी मनपा आयुक्तने निर्देश दिले आहेत. नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असल्याचं सांगत आहेत. मात्र मंडईत सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजल्याचं दिसून येत आहे.

मुंबईला कोरोनाचा विळखा सातत्याने वाढताना दिसत आहे. मुंबईत वरळीनंतर आता दादर, धारावी, माहिम परिसरातील रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दादरमध्ये आज 2, धारावीत 5, माहिममध्ये एका रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर मुंबईतील भाटिया रुग्णालयातील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मुंबईत आज (15 एप्रिल) 18 रुग्णांची वाढ झाली आहे.

दादरमध्ये कोरोनाचे रुग्ण हे सतत वाढत आहेत. दादरमध्ये कोरोनाचे आणखी दोन रुग्ण वाढले. हे दोन्ही रुग्ण दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आहेत. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या ही 21 वर गेली आहे. तर माहिमच्या प्रकाश नगरमध्ये एका 55 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे माहिममधील करोना रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे.

(Chembur Ration Store Queue)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.