Marathi News Maharashtra Mumbai Chief Minister 11 and Deputy Chief Minister will attend Dahi Handi programs at seven places mumbai
आजचा दिवस राजकीय दहीहंड्यांचा, मुख्यमंत्री 11 तर उपमुख्यमंत्री 7 ठिकाणच्या दहीहंडी कार्यक्रमांना राहणार उपस्थित, जाणून घ्या सविस्तर…
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही मुंबई आणि ठाणे परिसरात निरनिराळ्या राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणार आहे.
दहीहंडीच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
मुंबई : कोरोना काळानंतर यंदा दहीहंडी उत्सव (Dahihandi) राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांकडून मोठमोठ्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजकीय नेतेही आज या दहीहंडी कार्यक्रमात सहभागी होताना आपल्या दिसणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात होणारा हा पहिलाच मोठा जन उत्सव असणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही मुंबई आणि ठाणे परिसरात निरनिराळ्या राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणार आहे. एकनाथ शिंदे अकरा ठिकाणी तर देवेंद्र फडणवीस हे सात ठिकाणी या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.
एकनाथ शिंदे यांचे आजचे कार्यक्रम
दुपारी 12.00 वा. – दहीहंडी उत्सव
स्थळ : टेंभी नाका, ठाणे
दुपारी 01.00 वा. – दहीहंडी उत्सव
स्थळ :- घाटकोपर, मुंबई
दुपारी 02.00 वा. – दहीहंडी उत्सव
स्थळ : मागाठाणे, बोरिवली
दुपारी 02.30 वा.- दहीहंडी उत्सव
स्थळ : मीरा भाईंदर, जि. ठाणे
दुपारी 03.30 वा. – दहीहंडी उत्सव
स्थळ : भिवंडी, जि. ठाणे
सायंकाळी 05.00 वा.- दहीहंडी उत्सव
स्थळ : खेवरा सर्कल, हिरानंदानी मिडोझ, जि. ठाणे
सायंकाळी 05.30 वा. – प्रो गोविंदा दहीहंडी उत्सव
स्थळ : वर्तकनगर, ठाणे
सायंकाळी 06.30 वा. – दहीहंडी उत्सव
स्थळ : किसन नगर शाखा, ठाणे
सायंकाळी 06.30 वा. – दहीहंडी उत्सव
स्थळ :- रघुनाथ नगर
सायंकाळी 07.00 वा. – दहीहंडी उत्सव
स्थळ : अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे
रात्री 08.00 वा. – दहीहंडी उत्सव
स्थळ : टेंभी नाका, ठाणे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजचे कार्यक्रम
दुपारी 1.30 : दहीहंडी उत्सव-2022, जांबोरी मैदान, वरळी मुंबई
दुपारी 2.15 : दहीहंडी उत्सव-2022, कै. सदाकांत ढवण मैदान, अपना बाजार समोर, गोविंदजी केणी रोड, नायगांव, मुंबई
दुपारी 3.05 : दहीहंडी उत्सव-2022, श्रेयस सिग्नल, घाटकोपर, मुंबई