CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार ‘वर्षा’ निवासस्थानी शिफ्ट, मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, नंतर म्हणाले..

वर्षा या निवासस्थानी राहण्यापूर्वी तिथे पूजा करणार असल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वर्षावर राहण्यास जाऊ, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाबाबतही विचारणा केली होती. त्यावर त्यांनी तूर्तास काहीही बोलण्यास नकार दिला. 

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार 'वर्षा' निवासस्थानी शिफ्ट, मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, नंतर म्हणाले..
मुख्यमंत्री वर्षावर राहायला जाणार Image Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 9:15 PM

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर (cabinet expansion)स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच एकनाथ शिंदे हे वर्षा (Varsha bungalow) या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी शिफ्ट होणार आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्याला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता, हो लवकरच वर्षा निवासस्थानी शिफ्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बंगल्यात काही डागडुजीचे काम सुरु असून, लवकरच ते पूर्ण होईल, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. वर्षा या निवासस्थानी राहण्यापूर्वी तिथे पूजा करणार असल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वर्षावर राहण्यास जाऊ, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाबाबतही विचारणा केली होती. त्यावर त्यांनी तूर्तास काहीही बोलण्यास नकार दिला.

श्रीकांत शिंदे यांनीही केली होती सकाळी पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज सकाळीही वर्षा बंगल्याला भेट दिली होती. त्यावेळी सकाळी छोटेखानी पूजाही करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी उलटून ४० दिवसांनंतर त्यांनी आज पहिल्यांदा वर्षा निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर आता पुढील काही दिवस त्याची डागडुजी करण्यात येईल, त्यानंतर शिंदे तिथे राहणार असल्याची माहिती आहे.

वर्षा निवासस्थानी बैठका आणि कार्यालयीन कामकाज

वर्षा बंगल्याचा उपयोग एकनाथ शिंदे कार्यालयीन कामासाठी सुरु करणार असल्याचीही माहिती आहे. महत्त्वाच्या बैठकाही या निवासस्थानी पार पडणार आहेत. तसेच मंत्रालय आणि सह्याद्री अतिथीगृहावरही मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडतील. सकाळी एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी जाणार नसून, नंदनवन या बंगल्यावरच राहणार, अशी चर्चा होती. मात्र संध्याकाळी शिंदे यांनी आपण वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपाबाबत उद्या सांगणार – मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला, त्यात शिंदे गट आणि भाजपाच्या १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. आज पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली. मात्र अद्यापही खातेवाटप झालेले नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की याबाबत उद्या म्हणजे गुरुवारी माहिती देतो. म्हणजे उद्या खातेवाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुपारी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनीही खातेवाटपात मोठे बदल असतील असे संकेत दिले आहेत. आता खातेवाटपात कुणाकडे कोणती मंत्रिपदे येतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.