मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी थेट भेट; पेपरलेस कामकाजावर भर देऊन गतिमान होण्याच्या केल्या सूचना

पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्यांच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळी लावण्याची सुचनाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी थेट भेट; पेपरलेस कामकाजावर भर देऊन गतिमान होण्याच्या केल्या सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घेतली भेट Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 8:34 PM

मुंबई: गतिमान कार्यभार करताना अधिकाधिक पेपरलेस काम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा वाढेल ते पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांच्याकडून देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातल्या काही विभागांना आज स्वतः भेटी दिल्या तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ई-टपाल, पेपरलेस कामकाज (Paperless) प्रणालीविषयी सूचना करुन अडचणीही विचारण्यात आल्या. यावेळी कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना एका दिव्यांग कर्मचाऱ्याची (Divyang employees) त्यांच्यासमवेत छायाचित्र घेण्याची इच्छाही पूर्ण केली, आणि त्यांची विचारपूसही केली. अशा प्रकारे थेट विभागांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी बोलणारे मुख्यमंत्री विरळाच अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून अभिवादन करण्यात आले.

बाबासाहेबांवरील प्रदर्शन कायमस्वरूपी हवे

यावेळी पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्यांच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळी लावण्याची सुचनाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील बाबासाहेबांचा दस्ताऐवज तसेच पत्रं, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी केली व सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव साप्रवि डॉ. संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस आयुक्त संजय पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

कर्मचाऱ्यांच्या कामाची चौकशी

त्रिमूर्ती प्रांगणातील प्रदर्शनाची तयारी पाहून मुख्यमंत्री प्रथम मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्याठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे त्यांनी कौतुक केले तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही पूजन केले. कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्या कमाविषयीही जाणून घेतले.

पेपरलेस कामांवर भर

यानंतर मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधी व न्याय अशा विभागांना भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मुख्य सचिवांनी मंत्रालयात 6 एप्रिलपासून फाईल्स आणि कागदपत्रे यांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट याची मोहीम सुरु असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील पेपरलेस कामांवर भर देताना तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग करावा अशा सूचनाही केली. मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्ष तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षांना देखील भेट देऊन पाहणी केली व कामकाजाविषयी महत्वपूर्ण सूचना केल्या

मुख्यमंत्र्यांचा आपलेपणा

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही आपल्या भेटीस आलेल्या मुख्यमंत्र्यांची तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सुचनांमुळे उत्साह दुणावल्याची प्रतिक्रीया गृह विभागातील कर्मचारी अश्विनी राम धावणे यांनी दिली. याच विभागातील प्रगती विकास मोरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी, ‘कशा काय बऱ्या आहात ना?’ अशा शब्दांत विचारपूस केली. विधि व न्याय विभागातील सहायक कक्ष अधिकारी प्रियंका गावडे व त्यांच्या सहकारी म्हणाल्या, आमच्या विभागाला भेट देणारे मुख्यमंत्री ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री असावेत. त्यांनी अगदी साधेपणाने विचारपूस केली. कामाची चौकशी केली. त्यांच्या भेटीने आमचाही उत्साह वाढला असल्याची भावना व्यक्त केली.

महिला दिनानिमित्त पत्र आणि फुलांची दिली भेट

पहिल्याच वर्षी जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी आम्हा सर्वांना आपुलकीने पत्र आणि फुल देऊन आश्चर्यचकीत केले होते. त्यांची आजची भेटही अशीच आश्चर्यचकीत करणारी आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्यमंत्री व मंत्री आस्थापनेच्या कक्ष अधिकारी श्रीमती कल्याणी धारप व संगीत गुल्हाने म्हणाल्या, मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या विभागाला भेट देणे ही गोष्ट छान वाटली. त्यांनी आमच्याकडच्या लेजर बुक्स पाहून त्याविषयी बारकाईने जाणून घेतले.

संबंधित बातमी

Jitendra Awhad: तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा दिसतोय ते आरशात पाहा; जितेंद्र आव्हाडांचं खोचक उत्तर

Pune NCP : चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

CM Uddhav Thackeray : तब्बल वर्षभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात! पाहा Photos

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.