
“मेट्रो जुन्या सरकारच्या काळात 11 किलोमीटरची होती. त्यापलीकडे काही झालं नाही. मी मुख्यमंत्री झालो. एमएमआरडीए फक्त पैसा खर्च करत असल्याचं दिसत आहे. आयटी डेफिशियट बंगळूरू, हैद्राबादला गेलं. त्यानंतर मी मेट्रो करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भरवण्यावर मेट्रो प्लान केला. केंद्रकाडून पैसा घेतला नाही. 437 किमीचा मेट्रो प्लान केला. 200 हून अधिक किलोमीटरचं काम झालं. दिल्लीनंतर मेट्रो प्रकल्प आपला आहे. त्यांनी मेट्रोलाही विरोध केला. पुणे मेट्रोविरोधात भाषणं दिली. हे विकास विरोधी आहे. ते भावनिक थिअरी तयार करतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस सरकारच्या काळात मुंबई मेट्रोच काम खूप झपाट्याने झालं आहे.
“तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या. मिरा-भाईंदरला आमचे कृपाशंकर सिंह एक सभा करत होते. लोकांनी विचारलं की उत्तर भारतीय महापौर कधी होईल. तेव्हा ते म्हणाले निवडून दिल्यावर होईल. पण यांनी मुंबईचाच महापौर उत्तर भारतीय होईल असं त्यांनी उचलून धरलं. टीका सुरू केली. एमएमआयने हिजाबवाली पंतप्रधान होईल म्हटलं. त्यावर उत्तर दिलं. रशीद मामूला तुम्ही आपल्या पक्षात घ्याल तर आम्ही बोलणारच आहोत. आम्ही एमआयएमसोबत गेलोच नाही. जाणार नाही. टेक्निकली अकोटची युती राष्ट्रवादीशी होती. राष्ट्रवादीशी एमआयएमची युती होती. आमच्या लक्षात आल्यावर आम्ही बाहेर पडलो. आमच्या आमदाराने लक्ष दिले नाही म्हणून सस्पेन्शनची नोटीस आमदाराला दिली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडीटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली.
त्यांच्या भाषणात विकासाचा मुद्दाच नाही
“छोटी साई आल्यावर रवींद्र चव्हाण यांनी नमस्कार केला. यांनी फोटो काढून एमआयएमशी संबध जोडला. माझं कोणतंही भाषण ऐका 90 टक्के भाषण विकासाचं आहे. त्यांच्या भाषणात विकासाचा मुद्दाच नाही. 2014 सोडून द्या. त्यापूर्वी आम्ही नव्हतो. 25 वर्ष तुमच्याकडे आहे ना. तेव्हा काय केलं ते दाखवा ना” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलं.
मला एक लाख आणून द्या
“1 लाख रुपये तुम्ही आणू शकता माझं प्राईज मनी. माझी नगरपालिकेतील सर्व भाषणं आणि महापालिकेतील. मुंबई व्यतिरिक्त सर्व भाषणं काढा. त्यात कुठलाच उल्लेख दिसणार नाही. फक्त आणि फक्त विकासा एके विकासच असतो. त्यात दुसरं काही नाही. मुंबईत मात्र त्यांना उत्तर देण्यासाठी बोलावं लागतं. मी भाषणाचे संच देतो. मला एक लाख आणून द्या” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.