Devendra Fadnavis : फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, अदानीला ठाकरेंनीच कसं आणलं, त्याची Inside Story
Devendra Fadnavis : मला कमिश्नरचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं. उद्धव ठाकरे असं असं करत आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे कुणीच नव्हते. कोणत्याही पदावर नव्हते. कमिश्नर म्हणाले, आम्ही पुन्हा ऑफिशियल भूमिपूजन करू. पण मी म्हटलं नाही. मला श्रेय घ्यायचे नाही.

“धारावीचं रिडेव्हल्पमेंट राजीव गांधींनी सांगितलं होतं 84 मध्ये. 2014 पर्यंत काही झालं नाही. मी काम हातात घेतलं. मी समस्या सोडवल्या. मोकळी जागा हवी होती. केंद्र सरकारची रेल्वेची जागा घेतली. मी टेंडर काढलं. मी अदानीला दिलं नाही. मी दुसऱ्या व्यक्तीला दिलं होतं. एलओआय केला होता. उद्धव ठाकरे सरकार आले. उद्धव ठाकरेंनी एलओआय रद्द केला. त्यांनी टेंडर केला. चार लोकं आले. त्यात अदानीला मिळालं. म्हणजे अदानीकरण त्यांनीच केलं. मी ज्यांना टेंडर दिलं होतं. ते अनुभवी होते. आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. त्यांनी प्रमाणपत्र दिलं होतं. ते टेंडर रद्द केलं नसतं तर अदानी आला नसता” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “त्यांनी ज्या अटी आणि शर्ती घातल्या. त्या असत्या तर मुंबईत टीडीआर घोटाळा झाला असता. एक सर्टन टीडीआर धारावीचा घ्यावा लागेल. यांनी अनलिमिटेड टीडीआर दिला होता. त्यांनी मार्केट विकासकाला दिला होता. म्हणजे तो विकू शकला असता. आम्ही टीडीआरचं ट्रेंडिंग सर्वांसमक्ष ठेवण्याची अट ठेवली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“टीडीआरचा रेट रेडी रेकनरच्या पुढे जाणार नाही याची अट ठेवली. म्हणजे 90 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचं काम ठेवलं. यांच्या हातात असतं तर त्यांनी धारावी लुटली असती. हे अरुण्यरुदन करत आहे. हातून गेलं. माल कमवण्याचं स्वप्न तुटलं. हे भंग झालेले प्रेमी आहेत” अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली.
देशाच्या कायद्यात कोस्टल रोडची परवानगी नव्हती
“कोस्टल रोड संकल्पना त्यांचा विषयच नाही. ही संकल्पना आधीचीच होती. पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हा ते म्हणायचे आम्ही कोस्टल रोड करू. हे पण तेच म्हणायचे. 25 वर्षात कोस्टल रोड का नाही झाला? उद्धवजी राजकारणात नव्हते तेव्हा कोस्टल रोडची संकल्पना नव्हती. देशाच्या कायद्यात कोस्टल रोडची परवानगी नव्हती. आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. त्यांना रेक्लेमेशन करून कोस्टचं कसं संरक्षण करू शकतो हे दाखवलं. कायद्यात बदल केला. दोन वर्ष लागली. तीन पर्यावरण मंत्री बदलले. पाच मिटिंग झाल्या. प्रत्येकवेळी अडचण यायची” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
एक दिवस अचानक उठून उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं
“ते म्हणाले आम्ही रिक्लेमेशनला परवानगी देतो. पण दोनसे अडीचशे स्क्वेअरफुटाची जागा तयार होईल. ती रिअल इस्टेटला वापराल. त्यावेळी प्रतिज्ञापत्र दिलं. त्यात गार्डन आणि वॉकिंगसाठी जागा करू म्हणून सांगितलं. बीएमसी, एमएमआरडीए आणि एमएमआरसी करायला तयार होते. उद्धव ठाकरे म्हणाले हा प्रकल्प बीएमसीला द्या. आम्ही दिला. बीएमसीला दिल्यावर काही लोक हायकोर्टात आले. तिथे आम्ही लढलो. एक दिवस अचानक उठून उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं. पुन्हा भूमीपूजन करणार नाही. पण मी उद्घाटन मीच करणार आहे” असं फडणवीस म्हणाले.
