AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी पहाटेपर्यंत काम करतो, त्यानंतर अजितदादा- फडणवीस येतात…; मुख्यमंत्री शिंदेच्या वक्तव्याची चर्चाच चर्चा

CM Eknath Shinde on His Working Style Devendra Fadnavis and Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं नाव घेत एकनाथ शिंदे यांनी एक विधान केलं. याची चर्चा होतेय. वाचा सविस्तर

मी पहाटेपर्यंत काम करतो, त्यानंतर अजितदादा- फडणवीस येतात...; मुख्यमंत्री शिंदेच्या वक्तव्याची चर्चाच चर्चा
एकनाथ शिंदे
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 06, 2024 | 7:14 PM
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भांडुपमध्ये महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. महायुती उमेदवार मिहिर कोटेजा यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. भांडुपला या मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकर्ता मेळाव्याला मिहिर कोटेचा, माजी खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, आमदार राम कदम, मनीषा कायंदे हे नेते या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होतेय. मी पहाटेपर्यंत काम करतो. त्यानंतर पहाटे अजितदादा येतात. मग देवेंद्र फडणवीस असतात. आमचं कामाचं चक्री सुरूच असतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंची तंबी

आता महापालिकेची निवडणूक येत आहे. त्यामुळे त्या भागातून मतदान झालं तर नगरसेवकाला तिकीट मिळणार आहे. कारण तो निवडून येऊच शकत नाही ना जर मतदान झालं नाही तर… आमदारांच्यावर तोच विषय आहे. वर दोनजण बसले आहेत. मी ठाण्याच्या बैठकीत देखील सांगितलं आहे. नगरसेवकाने लीड दिला तरच त्याला तिकीट दिलं जाईल. कार्यकर्त्यांनी पण देखील काम केले तर ठीक नाहीतर त्यांचे पद काढून घेऊन त्यांच्यावर कारवाई करू. आपल्याला एक एक मत महत्त्वाचे त्यासाठी काम करा, अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी दिली.

मोदी सरकारच्या कामाचा आढावा

आजचा मेळावा ही प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक आहे. मी महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात आहेत. उद्या तिसरा टप्पा आहे. एक चांगलं वातावरण आपण पाहतोय. पाहिलं टप्पा आणि दुसरा टप्पा झाला. त्यात मेजोरिटी सीट महायुतीला मिळणार आहेत. मोदींनी मागील १० वर्षात केलेलं काम समोर आहेत. आम्ही गेल्या २ वर्षात केलेलं काम समोर आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

आपल्याकडे नेता आहे. नियत आहे. देण्या घेण्याची क्षमता आहे. मात्र समोर नेता देखील निवडू शकले नाहीत. सर्व एक एक वर्ष वाटून घेऊ म्हणतात. मोदींनी जगावर जादू केलीय. मी जेव्हा विदेशात जातो. मी विदेशात फिरायला जात नाही. थंड हवा खायला नाही जात. दावोसला गेलो होतो, उद्योग धंदे चे MOU साईन झाले. आपल्या सरकारने पॉलिसी बदलली, आहे उद्योगांना सोयी सुविधा देत आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ