मुख्यमंत्र्यांचा ‘यू टर्न’, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताफा परतला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुन (Matoshree) मंत्रालयाच्या दिशेने निघणार होते. त्यानुसार सुरक्षेचा सर्व ताफा बांद्रा ते मंत्रालयापर्यंत सज्ज होता.

  • अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 13:37 PM, 14 Jan 2021
uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाने राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप करणारी महिला रेणू शर्मा (Renu Sharma) आज पुन्हा एकदा पोलिसात पोहोचली. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सावध प्रतिक्रिया येत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. अशा परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) काय भाष्य करणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. (CM Uddhav Thackerays convoy return from western express highway )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुन (Matoshree) मंत्रालयाच्या दिशेने निघणार होते. त्यानुसार सुरक्षेचा सर्व ताफा बांद्रा ते मंत्रालयापर्यंत सज्ज होता. मुख्यमंत्र्यांचा ‘कॉन्वॉय’ कधीही बाहेर पडणार होता. मात्र अचानक मातोश्रीमधून निरोप आला, मुख्यमंत्री मंत्रालयाच्या दिशेने निघणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांचा ताफा परतला. ‘मातोश्री’च्या प्रवेशद्वारावर आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त लागला होता. हा सर्व बंदोबस्त हटवण्यात आला.

मुख्यमंत्री धनंजय मुंडे प्रकरणावर काय भूमिका घेणार?

दरम्यान, राज्यात गाजत असलेल्या धनंजय मुंडे प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया काय?

धनंजय मुंडे प्रकरणावर जशी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे, तशीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिक्रियेकडेही सर्वांच्या नजरा आहेत. शरद पवार हे धनंजय मुंडेंना पाठीशी घालणार असा आरोप आधीच भाजप नेते करत आहेत. त्यामुळे पवार नेमकी भूमिका काय घेतात हे पाहावं लागेल.

अजित पवार काय म्हणाले? 

राष्ट्रवादी नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर यापूर्वीच खुलासा केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष नवाब मलिक यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे,” असं म्हटलंय. तसेच, मलिक यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची असल्याचंही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय.

(CM Uddhav Thackerays convoy return from western express highway )

संबंधित बातम्या 

Breaking | धनंजय मुंडे प्रकरण, तक्रारदार महिला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल 

धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील म्हणतात….