AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray: खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, भगवे झेंडे अन् शिवसेनेची डरकाळी; सभेचा टीझर पाहाल तर…

CM Uddhav Thackeray: शिवसेनेने गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसंपर्क अभियान सुरू केलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून ही सभा होत आहे.

CM Uddhav Thackeray: खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, भगवे झेंडे अन् शिवसेनेची डरकाळी; सभेचा टीझर पाहाल तर...
खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, भगवे झेंडे अन् शिवसेनेची डरकाळीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2022 | 2:40 PM
Share

मुंबई: मनसे अध्यक्षव राज ठाकरे (raj thackeray) यांनी राज्यात सलग तीन सभा घेऊन राज्यातील वातावरण ढवळून काढलं. भोंग्यांचा मुद्दा हातात घेऊन राज ठाकरे यांनी आपली प्रखर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा निर्माण करून शिवसेनेला एक प्रकारे शह दिला आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात मजबूत पकड असलेल्या राष्ट्रवादीलाही त्यांनी डिवचले आहे. शरद पवार (sharad pawar) हे जातीयवादी असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीचा इमला डळमळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या महिन्याभरापासून राज यांनी आपल्या भोवतीच राजकारण फिरतं ठेवलं आहे. त्यातच राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तंबूत एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता शिवसेनाही मनसेला जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहे. येत्या 14 तारखेला शिवसेनेची मुंबईत विराट सभा होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेपूर्वीच शिवसेनेने एक दणदणीत आणि खणखणीत टीझर लॉन्च केला आहे. त्यामुळे शिवसेनेची सभा खणखणीत होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

सभा कधी आणि कुठे?

शिवसेनेने गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसंपर्क अभियान सुरू केलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून ही सभा होत आहे. येत्या 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबईतील बीकेसीवर ही सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. त्याशिवाय शिवसेनेच्या काही नेत्यांचीही या सभेत भाषणे होणार आहेत. या सभेच्या माध्यमातून शिवसेना निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असून जाहीर शक्तीप्रदर्शनही करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

टीझर काय सांगतो?

शिवसेनेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अवघ्या 15 सेंकदाचा टीझर जारी केला आहे. या टीझरला आतापर्यंत चार हजार लोकांनी पाहिलं आहे. तर 151 लोकांनी रिट्विट केला आहे. या टीझरच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दिसते. मी शिवसेनाप्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे. म्हणूनच मी शिवसेनाप्रमुख आहे, असं शिवसेनाप्रमुख बोलताना दिसत आहेत. शिवसेना प्रमुखांच्या सभेतील या विधानानंतर कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा ऐकू येतात. ढोलाच्या दणदणाटावर या घोषणा ऐकायला मिळतात. त्यानंतर साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, असं निवेदक सांगतो. शेवटी सभेची तारीख आणि वेळही दाखवली जाते. या व्हिडीओत तुंडूंब गर्दीने भरलेली शिवसेनाप्रमुखांची सभा, त्यांचं भाषण आणि उद्धव ठाकरे यांची सभा दाखवण्यात आली आहे. त्याशिवाय भगवा झेंडा आणि भगवे झेंडे घेऊन येणारे शिवसैनिकही दिसत आहे. थोडक्यात हा टीझर शिवसेनेने अत्यंत कडक केला आहे.

मुंबईत वातावरण निर्मिती

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या 14 मे रोजी मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेनिमित्ताने मुंबईत पक्षाकडून वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी या जाहीर सभेची भव्य होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. होर्डिंग्जवरील घोषवाक्यांतून भाजप आणि मनसेवर निशाणा साधला आहे. खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला …..यायलाच पाहिजे, असं या होर्डिंग्जवर ठळक अक्षरात लिहिलं आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच