प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल : मुख्यमंत्री

जर केंद्राने परवानगी दिली तर मला खात्री आहे की उद्या महाराष्ट्र देशालाच नाही, तर जगाला दिशा दाखवेल

प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल : मुख्यमंत्री

मुंबई : कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत वाढलेला लॉकडाऊन आणि वांद्र्यात उसळलेल्या जीवघेण्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Plasma Treatment And BCG Vaccine) आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) राज्याला एक आशेचा किरण दाखवला. कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि एक बीसीजी लस याबाबत प्रयोग करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. जर केंद्राने परवानगी दिली तर मला खात्री आहे की (Plasma Treatment And BCG Vaccine) उद्या महाराष्ट्र देशालाच नाही, तर जगाला दिशा दाखवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

आपल्या महाराष्ट्रात एक प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी वॅक्सिन यांचे प्रयोग करण्याची परवानगी आपण केंद्र सरकारकडे मागीतली आहे. देशातील संशोधकांनी पुढे यायला पाहिजे, लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं पंतप्रधान मोदी आज म्हणाले. मात्र, महाराष्ट्राने ही सुरुवात आधीच केली आहे. प्रयोगाला सुरुवात केली आहे. केंद्राची परवानगी मिळाल्यानंतर मला खात्री आहे की, उद्या महाराष्ट्र फक्त देशालाच नव्हे, तर जगाला दिशा दाखवेल. एवढी हिंमत आणि कसब महाराष्ट्रामध्ये आहे. तेवढी बुद्धिमत्ताही महाराष्ट्रामध्ये आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर प्रयोगाला सुरुवात होईल आणि आपण नक्की यात यशस्वी होऊ”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बीसीजी लस म्हणजे काय?

क्षयरोग प्रतिबंधक लस (बीसीजी) ही लस प्रामुख्याने क्षयरोगा (टीबी) साठी वापरली जाते. ज्या देशात क्षयरोग किंवा कुष्ठरोग सामान्य आहे तेथे निरोगी बालकांमध्ये जन्मानंतर लगेचच एक डोस देण्याची शिफारस केली जाते. क्षयरोग सामान्य नसलेल्या भागांमध्ये केवळ जास्त धोका असलेल्या मुलांनाच विशेषत: लसीकरण केले जाते. तर क्षयरोगाचा संशय असलेल्या प्रकरणांमध्ये वैयक्तिकरित्या तपासणी आणि उपचार केले जातात. ज्या प्रौढांना क्षयरोग नाही आणि पूर्वी लसीकरण केले गेलेले नाही. परंतू , वारंवार तसे आढळून आले आहे. त्यांनादेखील लसीकरण केले जाऊ शकते. बीसीजीची बुरुली अल्सर संसर्ग आणि इतर नॉनट्यूबरक्युलस मायकोबॅक्टेरिया संसर्ग याविरुद्धदेखील थोडी परिणामकारकता आहे. याव्यतिरिक्त ती काहीवेळा मूत्राशयाच्या कर्करोगाच्या उपचाराचा भाग म्हणून वापरली जाते.

प्लाझ्मा म्हणजे काय ?

प्लाझ्मा हा एक पिवळसर रंगाचा द्रव्य घटक आहे. हा आपल्या रक्तातील पेशींना संपू्र्ण शरीरात प्रवाहित करण्याचं काम करतो. तो रक्ताच्या 55 टक्के असतो. प्लाझ्मा हा रुग्णांना योग्य प्रमाणात दिल्याने शरीरात अँटीबॉडी तयार होतात. ही अँटीबॉडीज फक्त संसर्ग झालेल्या लोकांपासूनच तयार केल्या जाऊ शकतात.

कोविड-19 पासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, ज्या या विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याला कॉन्व्हुलसंट प्लाझ्मा थेरपी (Convulsant Plasma Therapy) असं म्हणतात. या थेरेपीचा वापर पहिल्यांदा 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू महामारीवेळी करण्यात आला होता.

उद्धव ठाकरे यांच्या निवदेनातील महत्त्वाचे मुद्दे:

 • कोरोनानंतर आणखी एक मोठं संकट येणार आहे हे संकट आर्थिक असेल.
 • आगामी काळात येणाऱ्या आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात समिती करण्यात आली आहे.
 • शेतकरी आपला अन्नदाता, त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.
 • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहिल.
 • 20 एप्रिलनंतर कोणते उद्योग सुरु करता येतील यावर अजित पवार आणि त्यांची समिती निर्णय घेईल.
 • मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये अधिक काळजी घेतली जात आहे.
 • तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मजुरांना शब्द
 • गोरगरीब मजुरांच्या भावनांशी खेळू नका, त्याचं राजकारण करु नका
 • कुणीतरी गैरसमजाचं पिल्लू सोडल्यामुळे वांद्र्यातील गर्दी
 • तुम्ही परराज्यातून आले आहात, पण तुम्हाला लॉक करुन ठेवण्यात आम्हाला आनंद नाही, मात्र काळजी करु नका, तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात
 • कोरोनानंतर आर्थिक संकटाच्या सामन्यासाठी समिती स्थापन
 • आरोग्य यंत्रणेसाठी टास्क फोर्स सज्ज
 • विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती
 • प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि ईसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल

Plasma Treatment And BCG Vaccine

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI